Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर शहरात चालणारे बेकायदेशीर कत्तलखाने तात्काळ बंद करा : गौरक्षा हिंदूदलची मागणी

team by team
December 14, 2021
in क्राईम
0
नवापूर शहरात चालणारे बेकायदेशीर कत्तलखाने तात्काळ बंद करा : गौरक्षा हिंदूदलची मागणी

नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरात चालणारे बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कार्यवाही करुन सुरु असलेले कत्तलखाने तात्काळ बंद करण्याच्या मागणीचे निवेदन गौरक्षा हिंदूदलतर्फे तहसिलदार मंदार कुलकर्णी ,पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांना देण्यात आले आहे.यावेळी गौरक्षा हिंदूदलचे सर्व पदधिकारी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, नवापूर शहरातील अनेक ठिकाणी गौ वंश हत्या अवैधरितीने कत्तलखाने सुरु आहेत. या कत्तलखान्याला कोणत्याही प्रकारची परवानगी नाही. याबाबत शहरातील नागरिकांना हरकत असून तसेच शहरातील अनेक भागांमध्ये गौ वंश हत्या हे खुलेआम सुरु आहेत. कसाई वाडा, नवापूर, इस्लामपुरा नवापूर, पाडवी ग्राऊंड, नवापूर, गढी परिसर, नवापूर व नारायणपूर रोड, नवापूर या ठिकाणी गौ वंश हत्या खुलेआम बेकायदेशीरपणाने सुरु आहे. तरी प्रशासनास वारंवार पत्र देऊनही कार्यवाही होत नसल्याचे आमच्या निदर्शनास येत आहे.तसेच नवापूर नगरपरिषद हद्दीतील धार्मिक स्थळ (नवीन महादेव मंदीर) शेजारी गौवंश हत्या होत असल्याने हिंदू धर्माची भावना दुखावली जात आहे. आणि या ठिकाणी अनुचित प्रकार घडू शकतो. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. तसेच नवापूर शहर हे शांतताप्रिय असून वाद होऊ नये, शहरातील शांतता नियमित रहावी म्हणून प्रशासनाला निवेदन करीतो की, आम्ही दिलेल्या निवेदन पत्राची दखल घेऊन तात्काल आपल्या आदेशानुसार शहरातील बेकायदेशीरचालणारे कत्तलखान्यांवर कार्यवाही करुन कायमस्वरुपी बंद करण्यात यावे. १५ दिवसांच्या आंत कार्यवाही करुन आम्हास उलट-टपाली खुलासा मिळावा, अन्यथा आम्ही गौ रक्षा हिंदू दलाच्या वतीने तहसिल नवापूर कार्यालयाच्या समोर आंदोलन करणार आहोत. याची कृपया प्रशासनाने नोंद घ्यावी व यामुळे कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या विभागाची राहील असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.निवेदनावर गौ रक्षा हिंदू दल समितीचे संदिप पाटील,पंकज सुर्यवंशी,राहुल दुसाणे,राजेंद्र गावीत,भाविन राणा,राहुल मराठे,धमेंद्र पाटील,जितेंद्र अहिरे,राकेश सोनार,राजेश सोनी यांचा सह्या आहेत.यावेळी भारतीय जनता पाटीचे जिल्हासरचिटणीस राजेंद्र गावीत उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

राज्य हिवताप निर्मुलन मध्यवर्ती संघटनेतर्फे आजपासून राज्यव्यापी लेखणीबंद आंदोलन

Next Post

टाटा मॅजिकची मोटरसायकलला धडक, दोघे युवक जखमी

Next Post
टाटा मॅजिकची  मोटरसायकलला धडक, दोघे युवक जखमी

टाटा मॅजिकची मोटरसायकलला धडक, दोघे युवक जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add