Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांची बदली रद्द करा: बिरसा फायटर्सची मागणी

team by team
July 10, 2021
in सामाजिक
0
नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांची बदली रद्द करा: बिरसा फायटर्सची मागणी

नंदुरबार ! प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांची आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथे झालेली बदली तात्काळ  रद्द करा,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री नंदुरबार  के.सी.पाडवी व अपर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन  महाराष्ट्र राज्य यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत बिरसा फायटर्सचे संस्थापक अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष मनोज पावरा,महासचिव राजेंद्र पाडवी,उपाध्यक्ष राजेश धुर्वे,महानिरीक्षक केशव पवार,कोषाध्यक्ष दादाजी बागूल,कार्याध्यक्ष नंदलाल पाडवी,राज्य प्रवक्ता रोहित पावरा,धुळे युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र पावरा, नंदुरबार जिल्हाध्यक्ष साहेबराव कोकणी ,ठाणे जिल्हाध्यक्ष सतिश जाधव, धुळे जिल्हाध्यक्ष वसंत पावरा,तळोदा तालुका अध्यक्ष सुभाष पावरा,अक्कलकुवा तालुका अध्यक्ष प्रा.संपत वसावे,शहादा तालुका अध्यक्ष संतोष वळवी,नवापूर तालुका अध्यक्ष राकेश वळवी,बागलाण तालुका अध्यक्ष आकाश पवार,मालेगाव तालुका अध्यक्ष शरद जाधव , नाशिक जिल्हाध्यक्ष दिपक सोनवणे,पालघर जिल्हाध्यक्ष मनोज कामडी, व अनेक बिरसा फायटर्स पदाधिकारी यांनी प्रशासनाला निवेदन पाठवले  आहे.

           निवेदनात म्हटले आहे की, अपर मुख्य सचिव (सेवा) सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई-400032 यांचा दि.9  जुलै रोजी बदली आदेशान्वये डाॅ. राजेंद्र भारूड जिल्हाधिकारी नंदुरबार यांची आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था  पुणे येथे बदली करण्यात आली  आहे. हे ऐकून नंदुरबार वासीय तसेच अनेक आदिवासी बांधवांची नाराजी निर्माण झाली आहे. कारण नंदुरबार हा आदिवासी बहूल जिल्हा अनेक वर्षापासून अजूनही दुर्लक्षित असून विकासापासून वंचित आहे.ब-याच वर्षांनी नंदुरबार सारख्या आदिवासी बहूल जिल्ह्यात डाॅ.राजेंद्र भारूड सारखे आदिवासी समाजाचे जिल्हाधिकारी जे आदिवासींच्या समस्या जाण असणारे जिल्हाधिकारी लाभले. डाॅ.राजेंद्र भारूड जिल्हाधिकारी नंदुरबार हे आदिवासी समाजाचे असल्यामुळे  आदिवासींच्या समस्या ब-यापैकी माहिती आहेत आणि त्यादृष्टीने त्यांचे नंदुरबार जिल्ह्यात चांगले काम सुरू होते.
              कोरोना काळात जिल्हाधिकारी नंदुरबार राजेंद्र भारूड यांनी उत्तम रित्या काम केलेले आहे.  “नंदुरबार  बना देश का मिसाल, कलेक्टर हो तो ऐसा” अशा बातम्या देशभर  प्रसारित झाल्या आहेत. संपूर्ण   देशभर राजेंद्र भारूड कलेक्टर नंदुरबार यांच्या ऑक्सीजन प्लांट व कोरोना नियंत्रण आणण्याच्या कामाचे कौतुक केले गेले . सुपरस्टार फिल्म  अभिनेता अजय देवगण , अमिर खान, महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे,महाराष्ट्र राज्य मुख्य सचिव  सिताराम कुंटे , हिंदी  न्यूज,मराठी न्यूज व इंग्रजी न्यूज चॅनेल वाले सुद्धा राजेंद्र भारूड यांच्या कामाचे कौतुक केले आहे. . सोशल मिडीवरही राजेंद्र भारूड यांच्या कामाची प्रशंसा लाखो प्रेक्षक करत आहेत. एवढेच नाही तर मा.उच्च न्यायालयाने सुद्धा  कोरोनाबाबतच्या नंदुरबार जिल्ह्यातील  कामाचे कौतुक केले आहे. अशा कौतूकस्पद प्रशासकीय कामगिरी बजावणा-या जिल्हाधिकारीची  नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्याच्या विकासकामांसाठी अत्यंत गरज आहे.
             नंदुरबार सारख्या एका आदिवासी जिल्ह्यात जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांनी ऑक्सीजन प्लांट तयार  करून संपूर्ण देशसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. नंदुरबार जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. ही नंदुरबार साठी व आदिवासींसाठी अभिमानाची गोष्ट आहे. नंदुरबार वासीय व आदिवासी जनतेच्या हिताचा व  भावनांचा विचार करून   कर्तव्य दक्ष, आदिवासी समाजाच्या समस्यांची जाण असणा-या,नंदुरबार जिल्ह्याचे नावलौकिक करून नंदुरबार जिल्ह्याच्या विकासात भर पाडणा-या डाॅ.राजेंद्र भारूड जिल्हाधिकारी नंदुरबार यांची आदिवासी संशोधन व प्रशिक्षण पुणे येथे झालेली बदली त्वरित  रद्द करावी व डाॅ.राजेंद्र भारूड यांना जिल्हाधिकारी नंदुरबार याच पदावर ठेवून सेवेची संधी द्यावी. अशी मागणी बिरसा फायटर्सतर्फे संस्थापक राष्ट्रीय  अध्यक्ष सुशिलकुमार पावरा सह अनेक पदाधिकारी यांनी केली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

पक्षविरोधी कारवाया करणार्‍या तिघांची राष्ट्रवादीतुन हकालपट्टी : डॉ.अभिजीत मोरे

Next Post

रयत शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी राहुल सोनार तर महिला आघाडीवर प्रियंका सोनार

Next Post
रयत शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी राहुल सोनार तर महिला आघाडीवर प्रियंका सोनार

रयत शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी राहुल सोनार तर महिला आघाडीवर प्रियंका सोनार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add