राष्ट्रवादी पक्षात असतांना काहीजण राजीनामा न देता पक्षविरोधी कारवाया करतांना आढळून आले आहेत. यामुळे अशा तिघांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष यांनी मौखिक राजीनामा दिला आहे. यामुळे आता सदरचे चौघेजण राष्ट्रवादीचे सदस्य नसल्याचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी पत्रकार परिषदेप्रसंगी सांगितले. नंदुरबार येथे राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेप्रसंगी डॉ.मोरे पुढे म्हणाले, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. येथे कार्यकर्त्यांना महत्व आहे. एकट्या पदाधिकार्यांच्या मताने कोणतेही निर्णय घेतले जात नाहीत. कार्यकर्त्यांना विचारात घेवूनच पक्षातर्फे निर्णय घेतले जातात. असे असतांना राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी राजीनामा अथवा कोणतीही सूचना न देता पक्ष सोडून गेले तर काही जण पक्षविरोधी कारवाया करतांना आढळून आले. यामुळे पक्ष शिस्तभंगाची कारवाई करीत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे आल्याचे डॉ.मोेरे यांनी सांगितले. यामध्ये राष्ट्रवादीच्या महिला विभागीय चिटणीस हेमलता शितोळे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, युवक आघाडी उपाध्यक्ष वामन पिंपळे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे डॉ.मोरे यांनी सांगितले. तर राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी इतर पक्षात प्रवेश करण्यापूर्वी मौखिक राजीनामा दिल्याने त्यांचा राजीनामा स्विकारण्यात आला आहे. यामुळे आता सदरचे चौघेजण राष्ट्रवादीचे सदस्य नाहीत असे डॉ.मोरे यांनी सांगितले. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आता संभ्रमात राहू नये, असे आवाहन देखील डॉ.मोरे यांनी केले.यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल साळी,नंदुरबार विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रविंद्र पाटील, शहादा तालुकाध्यक्ष रविंद्र कुवर,युवा नेते राऊ मोरे आदी उपस्थीत होते.
श्री.महेश शांताराम पाटील
9404747458
At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458