Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा पालिकेचे सत्ताधारी नगरसेवक माझ्या संपर्कात असून ते लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार : मा. आ.उदेसिंग पाडवी

team by team
December 12, 2021
in राजकीय
0
तळोदा पालिकेचे सत्ताधारी नगरसेवक माझ्या संपर्कात असून ते लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार : मा. आ.उदेसिंग पाडवी

तळोदा l प्रतिनिधी
तळोदा येथील नगरपालिकेच्या पुढील वर्षी होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपाला हरवण्यासाठी महाविकास आघाडी मार्फतच निवडणूक लढवणार, तसेच पालिकेच्या नगराध्यक्षासह बरेच नगरसेवक माझ्या संपर्कात असून येणाऱ्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडकेल असे प्रतिपादन माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांनी केले. यासाठी आमच्या काँग्रेस व शिवसेना या दोन्ही मित्र पक्षांशी बोलणी सुरू आहे.

तळोदा येथे पक्षाचे संपर्क कार्यालयाचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते. या वेळी ओबिसी सेलचे जिल्हाध्यक्ष कमलेश चौधरी, डॉ.तुषार सनसे, निखीलकुमार तुरखीया, केसरसिंग क्षत्रिय, डॉ.रामराव आघाडे, ओ बी सी सेलचे प्रदेश सरचिटणीस निलेश पाटील, शहराध्यक्ष योगेश मराठे, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी, डॉ.लक्ष्मीकांत गिरणार व्यासपीठावर उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की,जनतेच्या कामासाठी आज आम्ही तळोदा शहरात संपर्क कार्यालय उभारले आहे. तळोदा नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक पुढीलवर्षी म्हणजेच २०२२ मध्ये होऊ घातली आहे. ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवणार असून पालिकेतील सत्ताधारी भाजपाला हरविण्यासाठी तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीच्या झेंड्याखालीच लढवणार आहोत त्यासाठी काँग्रेस, शिवसेना या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणी सुरू आहे. सध्या विधान परिषदेचेही निवडणूक संपली असल्यामुळे काही नगरसेवकांशीही आमचा संपर्क सुरू असून लवकरच ते देखील राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करतांना दिसतील. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविकात शहराध्यक्ष योगेश मराठे यांनी म्हटले की शहरातील नागरिकांनी आपल्या ज्या समस्या असतील त्या बाबत आमच्याशी संपर्क साधावा त्यावर तातडीने समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप परदेशी यांनी केले होते. यावेळी निलेश पाटील, डॉ.तुषार सनसे, केसरसिंग क्षत्रिय यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

बातमी शेअर करा
Previous Post

अनुकंपातत्व नियुक्ती प्रकरणात २ महिन्यांच्या आत निर्णय घेण्याचा औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

Next Post

रनाळे येथे जय भगवान महासंघातर्फे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी

Next Post
रनाळे येथे जय भगवान महासंघातर्फे  लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी

रनाळे येथे जय भगवान महासंघातर्फे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add