नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली 14 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता क्रांतीवीर बिरसा मुंडा सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे ध्वजदिन 2021 निधी संकलनाचा सोहळा कार्यक्रम आयोजित केला आहे.

या कार्यक्रमात जिल्ह्यातील युद्ध विधवा, वीरमाता, वीरपीतांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच मागील वर्षी ध्वजदिन निधी संकलनाचे उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देवून गौरविण्यात येणार आहे.तरी जिल्ह्यातील माजी सैनिक तसेच ध्वजदिन निधी संकलनाचे उत्कृष्ट कार्य केलेल्या सर्व शासकीय, निम शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे.









