म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात भारतीय बौद्ध महासभेतर्फे बौद्ध धम्म परीषद कार्यक्रमाच्या आयोजन संदर्भात एक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेस उपस्थित असलेल्या प्रमुख व्यक्तीच्या हस्ते पुष्पहार टाकून अभिवादन करण्यात आले.
भारतीय बौद्ध महासभाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांचे नंदुरबार जिल्ह्यात आगमन दि.२६ डिसेंबर रोजी होत आहे.त्या संदर्भात सभेचे म्हसावद येथे आयोजन करण्यात आले होते. तरी गावातील जयभिम नवयुवक मंडळाचे पदाधिकारी व तरुण मित्र यांचे सहकार्य लाभले. यावेळी उपस्थित असलेले नंदुरबार जिल्हा अध्यक्ष सुनील रामोशी, जिल्हा उपाध्यक्ष आकाश जावरे, जिल्हा महासचिव पुष्पेन्द्र महाले, प्रचार व पर्यटन विभाग प्रमुख अजयभाऊ निकुंभे, जिल्हा संरक्षण कृष्णा पेंढारकर व जिल्हा कोषाध्यक्ष नागसेन साळवे, उप कोषाध्यक्ष जिग्नेश सामुद्रे व जिल्हा सल्लागार राहुल वानखेडकर, संस्कार विभाग प्रमुख गणेश पवार आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष गौतम अहिरे,चुनीलाल अहिरे,एन.डी.बागले,दिलीप आगळे,नितीन महेंद्र,मधुकर अहिरे,पुलायन जाधव,हेमंत महेंद्र,रामेश्वर अहिरे,विक्रांत अहिरे,राहुल आगळे,बुद्ध भूषण जाधव,ऋषिकेश वाघ,यांच्यासह समाजाचे नागरिक उपस्थित होते.शेवटी आभार दिलीप आगळे यांनी मानले.