नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हयात काल दोन कोरोना रुग्ण आढळले होते.आज पुन्हा जिल्ह्यात दोन जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे.
नंदूरबार जिल्ह्यात काल 2 व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता यात तळोदा येथील एक तर प्रकाशा ता. शहादा येथील एकाचा समावेश आहे. आज जिल्हा प्रशासनातर्फे 187 जणांची आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल प्राप्त झाला यात तळोदा तालुक्यातील दोन जण पॉझिटीव्ह आढळले.जिल्ह्यात सध्या सात रुग्ण आहेत.जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.