नंदुरबार | प्रतिनिधी
रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी नंदुरबार शहरात सहा तर नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथे चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात पोलीस दलातर्फे विविध कारवाई करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने रहदारीस अडथळा ठरणार्या विरूध्दही कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार रहदारीस अडथळा निर्माण करून नागरीकांचा जिवीतास धोका निर्माण होईल. अशा पध्दतीने मिळून आलेल्या नंदुरबार येथील राम बापू मराठे (रा.गवळीवाडा), राजेंद्र भालसिंग पाटील (जुनी भोईगल्ली,नंदुरबार), मुकेश गंगाराम गवळी (रा.गवळीवाडा,नंदुरबार), मुकेश गजेंद्र चौधरी (रा.दादागणपती मंदिराजवळ,नंदुरबर) अशोक बापू शिंदे (नंदुरबार), मनिष अशोक पाटील (रा.रायसिंगपुरा, नंदुरबार) यांच्याविरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नवापूर येथील तालुक्यातील चिंचपाडा येथील समिर रणजित गावीत (रा.मेनतलावरोड,नवापूर), नितीन शिरीष वळवी (रा.नवी सावरट ता.नवापूर), रणजित शिडया गावीत (रा.भांगरपाडा ता.नवापूर), दिनेश जयसिंग गावीत (रा.वडखुट पोष्ट पाटीबेडकी ता.नवापूर) यांच्या विरूध्द नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.