नवापूर l प्रतिनिधी
शहरातील लखाणी पार्क येथे राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यकर्ता शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष ,अमृत लोहार,न.पा विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे,राष्ट्रवादीच्या नगरसेवक खलील खाटीक, नगरसेविका मिनल लोहार,सविता नगराळे,शहर अध्यक्ष शरद पाटील,शहर उपाध्यक्ष राकेश गावीत,अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष इंद्रीस टिनवाला,मनोज वळवी,युवक कॉग्रेस जिल्हाउपाध्यक्ष इलेश गावीत,इरफान कुरेशी,सनी सावरे,आसिफ मेमन, मुद्दतसरअली सैय्यद,हेमंत नगराळे आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अमृत लोहार म्हणाले की राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचा वाढदिवसा निमित्त आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठया उत्साहात साजरा करायचा आहे.यामुळे सर्व राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदधिकारी यांनी कामाला लागावे.तसेच आजच्या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे कार्य व शरदचंद्र पवार यांचे विचार जनते पर्यत पोहचविण्या साठी कार्यकत्यांनी कटीबध्द व्हावे. कोरोना काळा मध्ये जे नागरीक मृत्यृमुखी पडलेले आहे.त्यांना शासनाकडुन ५० हजाराची योजना कशी मिळुन देता येईल त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहीजे.तसेच संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत वयोवृध्द नागरीकांना योजनेचा लाभ कसा मिळुन देता येईल यासाठी प्रयत्न करावा.घरकुल योजने अंतर्गत ज्या लोकांना पहिला किवा दुसरा हप्ता मिळाला आहे व उर्वरीत रक्कम मिळत नाही अशा नागरीकांचा सव्है करुन शासन दरबारी पाठपुरावा करुन उर्वरित रक्कम मिळविण्यासाठी कार्यकत्यांनी प्रयत्न केले पाहीजे.सोशलमिडीयावर कार्यकत्यांनी व पदधिकारी यांनी ॲक्टीव राहावे लागेल. विरोधक खोटा प्रचार करत असतात त्यांना वेळोवेळी उत्तर दिले पाहीजे.पक्षाचे कार्य व शासनाचे कोरोना काळातील नियोजन बध्द कार्य या सर्व गोष्टीचा व्यवस्थित प्रचार प्रसार झाला पाहीजे.या कार्यक्रमाचे सुञसंचलन नगरसेवक खलील खाटीक यांनी केले तर आभार शहर अध्यक्ष शरद पाटील यांनी केले.