नंदुरबार l प्रतिनिधी
मूळचे नंदुरबार येथील रहिवासी व सध्या ठाणे येथे कार्यरत असलेले खान्देशचे सुपुत्र राजेन्द्र शिंदे यांचा खान्देशरत्न भास्कराचार्य आदर्श शिक्षक पुरस्काराने ठाणे येथे सन्मान करण्यात आला.

पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भिवंडी या विद्यालयातील शिक्षक राजेंद्र एस.शिंदे, व्ही.एस.बिरारी,बी.के.ह्याळीस, एन.बी.पाटील यांचा केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री ना.कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ,चाळीसगावचे आ.मंगेश चव्हाण यांच्या हस्ते खान्देशरत्न भास्कराचार्य आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
मूळचे नंदुरबार येथील रहिवासी असलेले राजेंद्र शिंदे हे जिटीपी महाविद्यालयाचे विद्यार्थी असून, एनसीसी च्या युनिटचे ते अंडर ऑफिसर होते.आर.एस.पी. ठाणे जिल्हा अतिरिक्त समादेशक राजेंद्र एस.शिंदे, कल्याण तालुका कमांडर मनीलाल शिंपी, भिवंडी शहर समादेशक विश्वनाथ बिरारी, भिवंडी तालुका समादेशक अकबर पिंजारी, विजय देवरे, आर.एस.पी.अधिकारी भिवंडी, आर एस पी युनिट कल्याण शहर व भिवंडी शहर यांच्याकडून केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री ना.कपिल पाटील यांना हेलिपॅडवर सलामी व मानवंदना देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भिवंडी विद्यालयाचे प्राचार्य शजी.ओ.माळी यांच्याकडुन मंत्रीमोहदयांचे हेलिपॅडवर पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील व उपाध्यक्ष एन.एम.भामरे व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.








