नंदुरबार । प्रतिनिधी
नंदूरबार, साक्री, शिंदखेडा या तीन तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या प्रसिद्ध असलेले काळमदेव महाराजांची आजपासून तीन दिवस यात्रोत्सव सुरू होत आहे. नवसाला पावणारे काळमदेव महाराज हे भाविकांचे मनोकामना पूरणी करतात म्हणून येथे भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते. याठिकाणी डिसेंबर महिन्यात नागपंचमी निमित्त भरणाऱ्या यात्रोत्सवाला मध्यप्रदेश, गुजरात राज्यातून व धुळे जळगाव नाशिक येथून मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावीत असतात.
नंदूरबार, साक्री, शिंदखेडा या तीन तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या प्रसिद्ध असलेले काळमदेव महाराजचे मंदिर हे टेकडीवर उंचावर असून भाविकांना 105 पायऱ्या चढून जावे लागते ते यात्रेच्या दिवशी आपल्या मनातील काळमदेव महाराजांना नवस बोललेला असतो तो या दिवशी फेडतात. नैवेद्यासाठी गोड-धोड व जाऊळाचा कार्यक्रमासाठी बोकडाचा बळी देतात. यात्रेच्या दिवशी रात्री येथे भाविक भगत ही मोठ्या प्रमाणात काळमदेव महाराजांच्या मंदिरासमोर घुमतात, यात्रेत हॉटेल व्यवसायिक, व घर संसारोपयोगी वस्तु शेतकऱ्यांना लागणारे साहित्य व मनोरंजनासाठी तमाशा मंडळ, मौत का कुवा आदींसह व्यवसायिक मोठ्या प्रमाणात यात्रेत दाखल होऊन दुकाने थाटतात अशा प्रकारे विविध साहित्यांची दुकाने देखील थाटली जातात.या यात्रोत्सवानिमित्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
काळमदेव महाराजांची अशी आहे आख्यायिका
ब्रिटीश काळात अर्थात सन १७ व्या शतकात धुळे तालुक्यातील लळिंग गावाजवळ भोंड्या वाकुळ या डोंगरावर जगनपिता श्री शंकरजी भगवान यांनी संजीवनी मंत्र जपाने पाच देवांचा साक्षात्कार केला. त्यातील पहिले काळमदेवाचे स्थान हे नंदुरबार येथून अवघ्या २० ते २५ कि.मी अंतरावर शानिमांडळ जवळील वृजामाळ डोंगर आहे. चांगलखुलतान देवाचे दुसरे देवस्थान हेलवणे ता जि धुळे, तिसरे पुनपाच्या देवाचे देवस्थान वाघाळी, ता.चाळीसगाव जि.जळगाव, तर चौथे वनाराषीचे देवस्थान चामडी ता. चाळीसगाव , पाचवे धुरकाटा (काठोबा देव) यांचे देवस्थान आक्राळे ता. जि नंदुरबार येथे आहे. या पाचही मुनी ऋषींना जनाबाई नावाची मोठी बहीण होती या बहिणीने आपल्या भावांना आपले स्थान वाटून दिले होते. त्यानुसार या काळात काळमदेव ऋषींना भक्त पुजारीची याठिकाणी प्रसारा करिता आवश्यकता होती म्हणून ते (बासेर ता.साक्री ) येथे कन्हैयालाल महाराज यांची सेवा करणारा पावबा यास घेण्यास गेले. त्यांनी काळम देवांना प्रथमच आपले सेवाव्रत कठोर असल्याने ते आपल्याकडून पाळले जाणार नाही म्हणून त्यांनी सेवा भक्ती करण्यास नकार दिला. परंतु काळमदेवांच्या आग्रहास्तव पावबा ऋषी हे यावेळी नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ व इंद्रीहट्टी जामदे पेटले या गावांच्या हद्दीतील काळम देवाच्या सेवेसाठी ते दाखल झाले होते. येथे काळमदेवांनी पावबा ऋषींना आपले मंदिर बांधण्याची गळ घातली तेव्हा पावबा ऋषींनी सांगितले की , पण मंदिराचा इतका खर्च आणायचा कोठून असा प्रश्न यावेळी त्यांनी केला. यादरम्यान काळम देवांनी पावबा ऋषींना तू खर्चाची चिंता करू नकोस तुला मंदिराला लागणारा खर्च हा आपल्यासमोरील मोठ्या दगडाखालून निघत जाईल.तू फक्त उद्यापासून मंदिराच्या बांधकामास सुरुवात कर त्यानुसार पावबांनी नंदुरबार तालुक्यातील रनाळा येथील बांधकाम कारागिरांना आणून शुद्ध पंचमी नाग दिवाळी पासून शनिमांडळ वृंजामाळ या भव्य मोठ्या निसर्गरम्य पर्वतावर आणि शनिमांडळ रजाळे मोठ्या निसर्गरम्य पर्वतावर आणि शनिमांडळ रजाळे, ऐचाळे , जामदे ,इंद्रीहट्टी अशा गावांच्या सीमेवर काळमदेवांच्या मंदिराचा बांधकामास प्रारंभ झाला .पहिल्या दिवसाचा कारागिरांचा सर्व खर्च काळमदेवांनी दृष्टांत दिल्याप्रमाणे खरोखरच त्या दगडाखालून निघून कारागिरांना मजुरी अदा करण्यात आली. मात्र काळमदेवांनी सुचवलेल्या दगडाखालून पैसे निघतात त्या दगडाखालील पैसे काढण्याची लालसा कारागिरांना झाली आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी कामाला रात्री खूप पैसे मिळतील म्हणून त्या दगडाखालील पैसे काढण्याचा प्रयत्न केला. परंतु परंतु काळमदेवांनी येथे जो खर्च निघेल तो फक्त मंदिराच्या बांधकामास साहित्य मजुरीसाठी असेल असे आधीच सुचविले होते. याचा विसर कारागिरांना मात्र पडला. तेथेच दगडाला रात्रभर चिटकून राहावे लागले.सकाळी दगडा खालील पैसे चोरीसाठी आलेल्या कारागिरांना चिटकले पाहून पावबा ऋषींना त्यांना हा काय प्रकार आहे. असे विचारले असता या वेळी कारागिरांनी आम्ही रात्री या दगडा खालील पैसे चोरी करण्यासाठी आलो होतो पण आम्हाला पैसे मिळण्या ऐवजी येथेच चिटकून राहावे लागले आहे.यामुळे तुम्हीच आता आमची सुटका करा.तेव्हा पावबा ऋषींनी तुम्हाला आता काळमदेव महाराजांना शरण जाऊन क्षमा मागावी लागेल. याप्रसंगी पावबा ऋषींनी काळमदेवांना त्या कारागिरांना सोडण्याची विनंती केली. यावेळी काळमदेवांनी पावबा ऋषींना सांगितले असता एक अटवर सोडतो. माझ्या मंदिराचे बांधकाम यापुढे कारागिरांना विना मजुरी करावी लागेल. या शिक्षेवर कारागिरांची सुटका करतो असे सांगितले . काळमदेवांच्या या सांगण्यावरून कारागिरांनी तात्काळ होकार देत मंदिर पूर्ण होईपर्यंत बांधकाम विनामूल्य पूर्ण करू असे सांगितले त्यानंतर सदर कारागिरांची काळमदेव महाराजांनी सुटका केली.अशी काळमदेव महाराजांची आख्यायिका प्रचलित आहे.








