नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे करंजी बुद्रुक येथील शेतकऱ्याची तीन एकर केळी पिकाची बाग उद्ध्वस्त झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान शेतकर्याला झाले.
सविस्तर वृत्त असे की नवापुर तालुक्यातील करंजी बुद्रुक सह परिसरात दोन दिवस अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावा लागला आहे. झालेल्या अवकाळी पावसात करंजी बुद्रुक येथील शेतकरी आर. सी.गावित यांच्या तीन एकर भागातील केळी बागेत केळी झाडांचं व फळाचे मोठे नुकसान झाला आहे. अवकाळी पावसाच्या माऱ्याने केळीचे झाड पडले असून या शेतकरी आर. सी.गावित यांना लाखो रुपयांचे नुकसान झाला आहे. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्याने केली आहे.








