नवापूर | प्रतिनिधी
क्रांतीकारी बिरसा मुंडा स्मृती दिवस, वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह, स्वातंत्र्यवीर सावरकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कोरोनाचे संकट कमी झाल्यावर जिल्हा रुग्णालयात नियमित शस्त्रक्रिया सुरू झाल्याने नंदुरबार, शहादा, नवापूर, धडगाव, मोलगी, अक्कलकुवा तळोदासारख्या अतिदुर्गम भागातील रुग्णांना रक्ताची कमतरता भासत आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय नंदुरबार व नवापूर तहसिलदार मंदार कुलकर्णी यांच्या मागणीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने अग्रवाल भवनात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी यांच्या हस्ते राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार व दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. संकलीत करण्यात आलेले रक्त नंदुरबार जिल्हारुग्णालयातील रक्तपेढीत पाठविण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावित, घनश्याम परमार, दर्शन दीपक पाटील, सुभाष अग्रवाल, राजू अग्रवाल, डॉ.अमित मावची, डॉ. सुनील मावची, डॉ.विशाल वळवी, संघाचे मनोज मावची, निलेश प्रजापत, अजय गावित, कुणाल दुसाने, रामकृष्ण गिरासे, संदीप पाटील, दर्शन राजेश पाटील, हेमंत शर्मा, गोपी सेन, सोनू दर्जी आदी उपस्थित होते. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष भरत गावित, नगराध्यक्ष हेमलता पाटील, नगरसेवक महेंद्र दुसाने, विशाल सांगळे, विजूभाई सेन, बंटी चंदलानी, जयंतीलाल अग्रवाल यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी भेट दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किरण टीभे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी केले. आभार जितेंद्र अहिरे यांनी मानले.