Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रामपूर येथे शेतीच्या हिस्सेवाटणीवरुन तिघा भावांनी केला भावाचा खून वडील,जखमी

team by team
June 22, 2021
in क्राईम
0

शहादा | प्रतिनिधी-

रामपूर प्लॉट, ता.शहादा येथे शेतीच्या हिस्सेवाटणीवरून भावाभावात वाद होवून एका भावावर कुर्‍हाडीने व सळईने वार करुन खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामपूर येथील हिम्मत संभाजी पावरा (२८) यांचे वडील संभाजी वालजी पावरा हे युवराज पावरा, सुरेश पावरा, दोहन्या पावरा यांच्या घरी शेतीच्या हिस्से वाटणीसाठी आले असता, तेथे हजर त्यांच्याशी तिघा मुलांनी वाद घालून मारहाण करण्यात सुरुवात केली. यावेळी हिंमत संभाजी पावरा व त्याचा भाऊ वनसिंग पावरा हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता, युवराज पावरा याने त्याच्या हातातील कुर्‍हाडीने भाऊ वनसिंग पावरा याच्या डोक्यावर मध्यभागी वार करून गंभीर दुखापत केली. सुरेश पावरा याने त्याच्या हातातील लोखंडी सळई वनसिंग याच्या पोटात खोपसली. दोहन्या पावरा याने त्याच्या हातातील लाकडी डेंगार्‍याने वनसिंग याच्या छातीवर, पाठीवर व उजव्या हाताच्या दंडावर मारहाण करून गंभीर दुखापत केली. संभाजी पावरा यांनासुध्दा सुरेश पावरा याने सळईने उजव्या कानाच्या मागे, पोटावर मारहाण करून गंभीर दुखापत केली. हिंमत पावरा यांना लाकडी डेंगार्‍याने मारहाण करून दुखापत केली. या मारहाणीमुळे वनसिंग पावरा यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हिंमत पावरा व संभाजी पावरा यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. याबाबत हिंमत पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन युवराज पावरा, सुरेश पावरा, दोहन्या पावरा यांच्याविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२, ३०७, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांनी भेट दिली. पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, पोलीस उपनिरीक्षक सुनिल बिर्‍हाडे पुढील तपास करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे राष्ट्रपुरुषांच्या स्मृतीनिमित्त ६५ जणांचे रक्तदान

Next Post

ग्रामसेवकाचा कार्यभार सोपविल्याचा राग आल्याने सरपंच, उपसरपंचांची गटविकास अधिकार्‍यांशी हुज्जत

Next Post

ग्रामसेवकाचा कार्यभार सोपविल्याचा राग आल्याने सरपंच, उपसरपंचांची गटविकास अधिकार्‍यांशी हुज्जत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली  सुरुवात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली सुरुवात

August 26, 2026
प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add