नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्रातून सुरतकडे जाणाऱ्या श्री.हरी ट्रॅव्हल्सची बस भरधाव असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने
निझर तालुक्यातील रायगड गावाजवळ बस पलटली या अपघातात १० जण जखमी झाले असून.निझर पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, निझर-उच्छल राज्य महामार्गावर निझर तालुक्यातील रायगड गावाच्या हद्दीत महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून प्रवाशांना घेऊन सुरतकडे येणारी श्री.हरी ट्रॅव्हल्सची बस ( क्र.जी.जे.4, झेड. 0837) ही भरधाव असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला उलटल्याने भीषण अपघात झाला.यात २५ प्रवाशी होते पैकी १० प्रवासी जखमी झाले. 25 प्रवाशांपैकी शैलेश रोहिदास लिंगायत (वय 26) रा. रशियन नगर महाराणा प्रताप चौक गोदादरा लिंबायत , जगदीश संजय वानखेडे (वय 21) रा. भेस्तान हरिजन वास, फिरोज इस्माईल शेख (वय 38) रा. लिंबायत लिंबायत शाहपुरा, अनिल रोहिदास लिंगायत (वय 30) आणि लक्झरी क्लिनर सिद्धार्थ प्रेमचंद गुर्जर (वय 20) रा. नवागाम दिंडोली, सुरत हे गंभीर जखमी झाले असून अवकाळी पावसामुळे हा अपघात झाला. या ठिकाणी अपघात झाल्यानंतर प्रवाशांच्या आरडाओरडा ऐकून घटनास्थळी नागरिक पोहोचले.याप्रकरणी सिद्धार्थ प्रेमचंद गुर्जर (वय 20) रा. नवागाम दिंडोली, सुरत यांच्या फिर्यादीवरुन ट्रॅव्हल्स चालक चंद्रशेखर बापू पाटील रा.मांडळ गाव,ता.अमळनेर,जि.जळगाव यांच्या विरुद्ध निझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








