नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्हयात आज पाच रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान आज एक जण कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे.
नंदूरबार जिल्ह्यात आज नंदूरबार तालुक्यातील ४ तर नवापूर तालुक्यातील १ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात १ कोरोना रुग्ण असताना आजा प्रशासनातर्फे 282 जणांचा आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल प्राप्त झाला.त्यात नंदूरबार शहरातील स्मित हॉस्पिटल येथील एकाचा अहवाल
कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.सध्या जिल्ह्यात 2
कोरोना रुग्ण आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.








