नंदुरबार | प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील गुंलीअंबर शिवारातील चेकपोस्ट अंकलेश्वर बर्हाणपूर महामार्गावर दोन आयशर रस्त्यात आडव्या करून धिंगाना घालणार्या चार जणांविरूध्द अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनसार, अंकलेश्वर-बर्हाणपूर महामार्गावरील गुंलीअंबर शिवारातील आरटीओ चेकपोस्ट जवळ दि.१ डिसेंबर रोजी रात्री आयशर ट्रक (क्र.एम.एच.१९-सी.वाय.५५५६) व आयशर (क्र.एम.एच.१९-सी.वाय.२४०३) यांच्या काचा अज्ञात इसमांनी खोडसरपणाने अंधाराचा फायदा घेवून दगड भिरकावून फोडल्याने दोन्ही आयशर ट्रक संशयीत आरोपींनी महामार्गावर आडव्या लावून जाणार्या व येणार्या वाहनांना जाण्या येण्यासाठी प्रतिबंध करून दोन्ही वाहनाची वाहतुक जाम करून तेथे लोकांची गर्दी जमवून जिल्हाधिकार्यांचा जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पोशि अविनाश रंगाने यांच्या फिर्यादीवरून समाधान गोपाल निकम रा.भामरूड (ता.पाचोरा जि.जळगांव), श्रीकृष्ण विठ्ठल बिरारी, योगेश शालीग्राम बाविस्कर रा.पाळधी (ता.धरगांव जि.जळगांव), दिलीप प्रभाकर माळी रा.पाळधीदोनगांव (ता.धरणगाव) यांच्याविरूध्द अक्क्लकुवा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३४१, १८८, ३४ सह महा.पो अधि क ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोना देविदास विसपुते करीत आहेत.








