नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील खटवडा येथे भांडण सोडविण्यासाठी गेल्याचा राग येवून एकास काठीने डोक्यावर मारुन दुखापत केल्याप्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील खटवडा येथील माला पावरा व जयसिंग सायसिंग पावरा यांचे भांडण सुरु होते. हे भांडण सोडविण्यासाठी माला पावरा यांचा भाऊ खुशाल मिसरा पावरा याने मध्यस्थी केली. याचा राग आल्याने जयसिंग पावरा याने खुशाल पावरा यांच्या डोक्यावर काठीने मारुन दुखापत केली. तसेच त्यांची मोटारसायकल खाली पाडून नुकसान केले. याबाबत खुशाल मिसरा पावरा रा.खटवडा ता.धडगाव यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात जयसिंग पावरा रा.खटवडा ता.धडगाव याच्याविरोधात भादंवि कलम ३२४, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.शशिकांत वसईकर करीत आहेत.








