नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील खर्डा येथे डाकीस असल्याच्या संशयातून महिलेस जिवेठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील खर्डा येथील दितूबाई जामला वळवी डाकीण असून जादूटोणा करीत असल्याचा वारंवार संशय घेत वण्या चामऱ्या वळवी याने महिलेस शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दितूबाई जामला वळवी यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात वण्या वळवी याच्याविरोधात महाराष्ट्र जादूटोणा अधिनियम कलम ३ (२) भादंवि कलम ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक आर.जी.औताडे करीत आहेत.








