नंदूरबार l प्रतिनिधी
राज्यातील शाळांमधील वर्ग १ डिसेंबर पासून सुरु करण्याच्या निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शैक्षणिक वर्षात जिल्हयातील ग्रामीण भागात इ .१ ली ते ४ थी चे वर्ग व शहरी भागातील इ .१ ली ते इ . ७ वी चे वर्ग सुरु होणार असुन त्यासाठी मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागातर्फे देण्यात आल्या आहेत. जिल्हयात जिल्हा परिषद व नगरपालिका व इतर व्यवस्थापनाच्या १ हजार ८५३ शाळांमध्ये एकुण १ लाख ८८ हजार ८५३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.शाळा सुरू करण्याबाबतच्या निर्णयावर शिक्षण विभाग ठाम असुन भरारी पथकांद्वारे शाळाभेटीचे नियोजन करण्यात आले आहे .
शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडुन नविन मार्गदर्शक सुचना आणि त्यासाठीचा आदेश आज जारी करण्यात आला आहे.त्यात जिल्ह्यातील जिल्हयातील ग्रामीण भागात इ .१ ली ते ४ थी चे वर्ग व शहरी भागातील इ .१ ली ते इ . ७ वी चे वर्ग सुरु होणार आहेत. जिल्हयात जिल्हा परिषद व नगरपालिका व इतर व्यवस्थापनाच्या १ हजार ८५३ शाळांमध्ये एकुण १ लाख ८८ हजार ८५३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.प्रत्येक शाळा दर दिवशी दोन सत्रात किमान तीन ते चार तासासाठी सुरू करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मनिषा खत्री, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे , शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) डॉ.राहुल चौधरी , नंदुरबार शिक्षण विभाग यांनी सूचना पारित केल्या असून याअनुषंगाने जिल्हा परिषदेतील विविध जिल्हा प्रमुख व शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी ( शिक्षण ), केंद्रप्रमुख, विशेष शिक्षक माध्यमिकस्तर, फिरते विशेष शिक्षक , समावेशित शिक्षण विषयतज्ज्ञ , साधन यांच्याद्वारे भरारी पथकांद्वारे शाळाभेटीचे नियोजन करण्यात आले आहे . सर्व विभागप्रमुख व अधिकारी व कर्मचारी यांनी दि.१ ते ३ नोव्हेंबर पर्यंत विविध मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन शाळा भेटीचे प्रपत्रातील मुद्देनिहाय मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन शाळा सुरळीत झाली आहे किंवा नाही याबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या सुचना पाळणे आवश्यक
शाळा दोन सत्रांत भरवाव्यात. दोन बाकांमध्ये सहा फुटाचे अंतर हवे एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी असावेत, विद्यार्थ्यांस कोरोना झाल्याचे आढळल्यास तत्काळ शाळा बंद करावी, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचार्यांचे लसीकरण पूर्ण हवे ,पहिल्या एक ते दोन आठवड्यांमध्ये थेट शिक्षणावर भर न देता विद्यार्थ्यांना शाळेची सवय होऊ द्यावी . त्यासाठी आनंददायी शिक्षणावर भर द्यावा . गणवेश ऐच्छिक करावा . शाळा , वर्गखोल्या आणि परिसर दररोज नियमित स्वच्छ व निर्जंतुक करावा . सॅनिटायझरची व्यवस्था करावी . पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके , कोणतेही खेळ घेऊ नयेत, प्रत्यक्ष वर्गाचा कालावधी तीन ते चार तासांपेक्षा अधिक असू नये, सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात विद्यार्थ्यांची रोज तापमान तपासणी करावी संसर्ग टाळण्यासाठी पालकांनी शक्यतो विद्यार्थ्यांना वैयक्तिक वाहनाने शाळेत सोडावे . १०० टक्के लसीकरण झालेले वाहनचालक आणि मदतनिसांचीच सेवा घ्यावी.








