स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षण मोबाईल ऍपवर अभिप्राय नोंदविणेबाबत प्रशिक्षण वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण संपन्न झाले.
शहादा पंचायत समिती शिक्षण विभाग गटशिक्षणाधिकारी डी.टी.वळवी यांनी उपस्थित शिक्षकांना मोबाईल ऍपद्वारे माहिती भरण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी सुनिल तावडे,प्रकाशा केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र धनगर,जावदे केंद्राचे केंद्रप्रमुख रावसाहेब बाविस्कर,अमोदा केंद्राचे केंद्रप्रमुख युवराज मोरे,लक्कडकोट केंद्राचे केंद्रप्रमुख लक्ष्मण भावसार तसेच शेठ व्ही.के.शाह हायस्कुल येथे असलोद, डोंगरगाव,लोणखेडा, शिरूर दिगर,परिवर्धा केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक उपस्थित होते.जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या निर्देशानुसार स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२१ यात सहभाग नोंदवून शिक्षण विभागाच्या यंत्रणेने मोहिम व्यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा परिषद नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे,उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी, उपशिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण यांनी केलेले आहे.यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक तसेच ऍन्ड्राईड मोबाईल धारक सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहभाग नोंदविण्यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रीया करुन घेण्यात आली. https://play.google.com/store/apps/details?id=com.geostat.ssgrameencf.twenine या लिंकद्वारे गुगल प्ले स्टोअर वरुन स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ डाऊनलोड करुन त्याद्वारे फीडबॅक नोंदवावे.सदरची प्रक्रीया लवकरच पूर्ण करावी.याकामी तंत्रस्नेही शिक्षक यांची मदत घेऊन शहरी, ग्रामीण भागातील संगणक कक्ष सुविधा उपलब्ध असलेल्या शाळांमध्ये प्रतिसाद नोंदणी कक्ष उभारुन तेथून सर्व मुख्याध्यापक , शिक्षक तसेच विद्यार्थी यांच्याकडून अथवा त्यांना सोयीचे होईल या दृष्टीने नियोजन व अहवाल सादर करण्यात यावे या दृष्टीने मार्गदर्शन प्रकाशा बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी सुनील तावडे यांनी उपस्थित सर्व केंद्रप्रमुख मुख्याध्यापक शिक्षक यांना सांगितले.








