नंदुरबार | प्रतिनिधी
थकबाकीवरुन महावितरण आणि तहसिल कार्यालयात चांगलीच जुंपली आहे.वीज बिल थकीत असल्याने महावितरणने तहसिल कार्यालयाचा वीज पुरवठा खंडीत केला तर तहसिलचे कामकाज ठप्प असल्याने महावितरणकडे महसूलची अकृषक थकबाकी असल्याने तहसिलदारांनी तात्काळ कारवाई करत चक्क महावितरणचे कार्यालयच सील करत प्रतिशॉक दिला.या बाबत हा वाद जिल्हाधिकार्यां पर्यंत पोहचला असतांना महसुल विभागाच्या कर्मचार्यांनी पुन्हा आष्टे सब स्टेशन सिल केले आहे.
महावितरणकडून वीज बिल वसुलीसाठी धडक मोहीम चालवली आहे. थकबाकीदार व वीज चोरांवर थेट गुन्हे दाखल केले जात आहेत.महावितरणकडून वरिष्ठांच्या आदेशानुसार थकबाकी असल्याचे सर्वसामान्यांचे थेट वीज पुरवठा खंडीत करत शॉक दिला जात आहे.दरम्यान नंदुरबार तहसिल कार्यालयाकडे महावितरणचे सुमारे दीड लाख रुपये वीज बिल थकले होते. तहसिल कार्यालयाला शॉक देत चक्क वीज पुरवठा खंडीत केला.त्यामुळे तहसील कार्यालयातील काम ठप्प झाले.यामुळे तहसिलदारांनी प्रतिशॉक देत महावितरण कंपनीच्या सबस्टेशन आणि कार्यालयांकडे थकीत असलेल्या सुमारे तीन लाख ४२ हजार रुपयांचा अकृषक भरणा का केला नाही अशी विचारणा करीत थेट नंदुरबार शहरातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाला सील ठोकले.यामुळे महावितरण कंपनीचे कर्मचारी जिल्हाधिकार्यांकडे गेले सायंकाळी याबाबत बैठक आयोजीत करण्यात आली असतांना महसुल विभागाच्या कर्मचार्यांनी महावितरण कंपनीला पुन्हा शॉक देत आष्टे सब स्टेशन सिल केले आहे.