नंदुरबार | प्रतिनिधी
अक्कलकुवा येथे मोटारयासकलच्या धडकेत पादचारी युवक ठार तर शहादा तालुक्यातील कलसाडी गावाजवळ अज्ञात वाहन चालकाच्या धडकेत मोटारसासकल चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्या असुन अक्कलकुवा व शहादा पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा ते मोलगी रोडवर जामिया नर्सरी जवळ रस्त्यावर दि. २३ नोव्हेंबर रोजी रात्री १० ते सकाळी ६ वाजेदरम्यान अमिर सैफुद्दीन बलोच (वय २२ ) रा . मक्राणी ता . अक्कलकुवा हा पायी जात असतांना पाठीमागून अक्कलकुवा कडून मोटार सायकल (क्र . एम.एच. ३९, ए.ए.३२९६) वरील अज्ञात चालकाने पाठीमागून भरधाव वेगाने येवून अमिर बलोच यास जोराने ठोस मारली. या अपघातात अमिर बलोच यास डोक्यास जबर दुखापत करून त्याच्या मरणास कारणीभुत झाला व अपघाताची खबर न देता सदर ठिकाणाहून पळून गेला म्हणून तौसिक शासवान मक्राणी रा . इंदिरानगर .अक्कलकुवा यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात एम.एच. ३९, ए.ए.३२९६ यावरील मोटारसायकल चालकाविरूध्द भादंवि कलम ३०४ ( अ ) , २७९ , ३३७,३३८ व मोटार वाहन का . क . १८४,१३४ / १८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास सपोनि राजेश गावीत करीत आहेत.
दरम्यान दुसर्या घटनेत उज्वलसिंग भिमसिंग गिरासे (वय ४०) रा . कलसाडी ता . जि . नंदुरबार हे भावाची मोटारसायकल ( क्र . एम.एच. ३९, के. २४९ ४) ईच्यावर नेहमी प्रमाणे शहादा येथून परिवर्धा येथे कामावरून घरी येत असतांना शहादा ते कलसाडी रोडवरील कलसाडी गावाजवळ अज्ञात वाहन चालकाने रस्त्याच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने वाहन चालवून मोटार सायकला जोराने ठोस मारली या अपघातात उज्वलसिंग भिमसिंग गिरासे हे मोटार सायकल वरून रोडावर पडून त्यांचे डोक्याला व चेहर्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.मरणास कारणीभुत झाला व अपघाताची खबर न देता पळून गेला तसेच मोटार सायकलीचे नुकसानीस कारणीभूत झाला म्हणून नरेंद्र भिमसिंग गिरासे यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरूध्द भादंवि कलम ३०४ ( अ ) , २७९ , ३३८ , ३३७ , ४२७ मो . वा . का . क . १८४ , १३४ / १८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोना जितेंद्र ईशी करीत आहेत.








