नंदुरबार | प्रतिनिधी
अक्कलकुवा येथे विना परवाना रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमंखासह ३० जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा प्रकल्प कार्यालयाअंतर्गत काम करणार्या सर्व वर्ग ३ वर्ग ४ रोजंदारी मानधन कर्मचारी यांचे विविध मागण्यासाठी दि.२४ नोव्हेंबर रोजी अक्कलकुवा तहसिल कार्यालयासमोरील अंकलेश्वर बर्हाणपुर हायवे रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करुन येणारे जाणारे वाहनांना येण्या जाण्यापासुन अटकाव करुन रहदारीस अडथळा निर्माण करुन कोरोना संदर्भातील कोणत्याही अटीचे पालन न करता जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या जमावबंदी आदेशाचे व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोना खुशाल माळी यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या फुलजी पाडवी, किरण इच्छाराम भावसार रा. लोहारगल्ली, अक्कलकुवा, ललितकुमार जगदीश जाट रा.खापर, निदानसिंग जालमसिंग सिकलीकर रा शिखफळी, दिपक तुळशीराम मराठे रा.परदेशी गल्ली, नासिरयार मोहमंद बलोच रा. मक्राणीफळी, सलाउद्यीन समोउद्यीन हाश्मी रा.अक्कलकुवा, हबीब सत्तार रा अब्दुल मक्राणीफळी, सचेंद्रसिंग उर्फ गोलु मोहनसिंग चंदेल रा.लोहार गाडी व इतर २५ ते ३० अनोळखी स्त्री पुरुषांविरूध्द भादवि कलम १८८, २६९,३४१, २७०,म.पो.का.क.३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोसई अशोक काळे करीत आहेत.








