नंदुरबार l प्रतिनिधी
दिवसा घरफोडीच्या गुन्ह्यातील आंतर राज्यीय टोळीतील २ अट्टल गुन्हेगारांना पुणे येथे शिताफीने स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकत १३ लाख ७७ हजार ३३५ रुपये किमंतीचा मुद्देमालासह ४ गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मागील काही दिवसांपासुन नंदुरबार जिल्ह्यात दिवसा घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होवून पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते . चोरट्यांना जेरबंद करून घडलेले गुन्हे उघडकिस आणने पोलीसांसमोर आवाहन बनले होते . यावरुन पोलीस अधिक्षक पी . आर . पाटील यांनी दिवसा घरफोडीच्या गुन्ह्यांबाबत गांभीर्याने चर्चा करुन दिवसा घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालुन आरोपी अटक करुन त्यांच्यावर कठोर प्रतिबंधक कारवाई करणेबाबत सक्त निर्देश दिले . तसेच गुन्हे कशा प्रकारे उघडकीस आणावेत याबाबत मार्गदर्शन व सुचना दिलेल्या होत्या , त्यातच दि. १० नोव्हेंबर रोजी नंदुरबार शहरातील रुख्माई नगर येथे दिवसा १० ते १.३० वा . दरम्यान किशोर माणिक रौंदळ यांचे घराचे कुलूप तोडून १० हजार रुपये रोख व २ लाख ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या अमलदारांनी लागलीच घटनास्थळाकडे धाव घेतली तेथील घटनास्थळाची पाहणी करीत असतांनाच देवचंद नगर येथे राहणारे रजनी सुरेश मंगळे यांचे देखील घराचे कुलुप तोडुन २० हजार रुपये रोख व ६ लाख ५२ हजार ३०० रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने घरफोडी करुन चोरुन नेल्याचे समजल्याने एकच खळबळ उडाली म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी पथकासह देवचंद नगरकडे जात असतांना त्यांना एक राखाडी रंगाचे (MH – १८) पासिंगचे अनोळखी चारचाकी वाहन दिसले त्यांचा संशय आल्याने त्यांना थांबविण्याचा इशारा केला असता त्यांनी भरधाव वेगाने आपले वाहन धुळे रोडकडे वळविले . चारचाकी वाहनाचा पाठलाग करीत असतांना संशयीत आरोपीतांनी दोंडाईचा येथुन वाहन सारंगखेडा गावाकडे कळविले व तेथे एका शेतातील झाडाला ठोकले गेल्यामुळे संशयीत आरोपीतांनी त्यांचे चारचाकी वाहन सोडुन पळुन गेले . पळुन गेलेल्या दोन्ही संशयीतांचा आजु बाजूच्या परिसरात रात्रभर शोध घेवुन ते मिळुन आले नाही . सदर चारचाकी वाहनाची पाहणी केली असता वाहनामध्ये वाहनाचे कागदपत्र , कपड्यांची बॅग , दवाखाण्याचे कागदपत्र व घरफोडी चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारे टॅमी हत्यार व इतर साहित्य मिळुन आल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी सदरची घटना पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांना कळविली वरिष्ठांच्या वरील सुचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक तयार करुन दि . ११ नोव्हेंबर रोजी एक पथक मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ , इंदौर , सिहोर जिल्ह्यात तर एक पथक पुणे येथे संशयीत आरोपीतांचा शोध घेण्यासाठी रवाना केले . तसेच नंदुरबार जिल्ह्याला लागून असलेल्या इतर जिल्ह्यांमध्ये दिवसा घरफोडीचे दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती घेण्यासाठी एक पथक रवाना केले . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भोपाळ , इंदौर , सिहोर , रायसेन , ओबेदुल्लागंज मध्य प्रदेश राज्यात सलग ८ दिवस राहुन संशयीत दोन्ही आरोपीतांचा ठाव ठिकाणा शोधला , परंतु दोन्ही आरोपी गुन्हा करून मध्य प्रदेश राज्यात आले नाहीत तसेच दोन्ही संशयीत आरोपीतांचे नातेवाईक , इतर साथीदार यांची माहिती काढून त्यांचा शोध घेतला असता त्यांनी देखील काही एक उपयुक्त माहिती दिली नाही . पुणे येथे गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुख्य संशयीत आरोपीताच्या पत्नीची माहिती काढून सलग ८ दिवस तिच्या घराच्या आजू – बाजूस वेशांतर करून बातमीदारांचे जाळे निर्माण केले . पुणे सारख्या नविन शहरात देखील अवघ्या आठच दिवसात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास बातमीदार तयार करण्यात यश आले होते . तसेच पथक संशयीताच्या पत्नीच्या घराच्या आजुबाजुस रात्रंदिवस वेशांतर करून पाळत ठेवून संशयीताच्या पत्नीच्या घरी येणारे जाणारे इसमांची माहिती घेत होते , परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे आरोपीतांचे टोपन नाव होते त्याचा फोटो किंवा मोबाईल नंबर नव्हते त्यामुळे पथकाला आरोपीचा शोध घेण्यात अनेक अडचणी येत होत्या . म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुख्य संशयीताची पत्नी व तिचा एक मित्र अशांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली . त्यांना पोलीसी खाक्या दाखवून त्यांना बोलते केले . तरी देखील त्यांनी काही एक उपयुक्त माहिती दिली नाही . दि. २२ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पुणे येथील बातमीदामार्फत बातमी मिळाली की गुन्ह्यातील मुख्य संशयीत आरोपी हा त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी सायंकाळी गोपाळपट्टी , मांजरी याठिकाणी येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली . बातमीप्रमाणे मुख्य संशयीत आरोपी त्याठिकाणी सायंकाळी आला , त्याच्या पत्नीची भेट घेत असतांना अतिशय चालाक असा संशयीत आरोपीतास आपण पोलीसांच्या सापळ्यात अडकलो गेलो असल्याचे लक्ष्यात येताच त्याने त्याठिकाणाहून पळ काढला , सापळा लावून बसलेले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा सुमारे १ किलो मिटर पाठलाग त्यास ताब्यात घेतले . ताब्यात घेवून त्यांचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव शैलु ऊर्फ शैलेंद्र रामचरण विश्वकर्मा रा . हनुमान मंदीर जवळ चाणक्यपुरी सिहोर ता . जि . सिहोर मध्य प्रदेश असे सांगितले . त्यास नंदुरबार येथे केलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याच्या साथीदारासह केल्याचे सांगितले . त्याच्या दुसऱ्या साथीदाराबाबत विचारपुस केली असता सद्या तो शिक्रापुर जि . पुणे येथे भाडे तत्वावर घर घेवून राहत असल्याचे सांगितले . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयीत आरोपी शैलेंद्र विश्वकर्मा यास सोबत घेवून शिक्रापूर जि . पुणे येथे जावून त्याच्या साथीदाराचा शोध घेतला असता एका छोट्याश्या घरामधून दुसऱ्या संशयीतास ताब्यात घेतले . त्यास त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव संतोषसिंग सौदागरसिंग ( मान पंजाबी ) रा . राजीव गांधी नगर , सेक्ट- A , EWS , घर नंबर -२२४ अयोध्या रोड , पिपलाणी भोपाळ मध्य प्रदेश असे सांगितले . ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपीतांना वेगवेगळे बसवून विचारपूस केली असता त्यांनी नंदुरबार येथे चोरी केलेला मुद्देमाल दोघांनी मिळुन वाटून घेतला असुन त्यांचेकडुन हस्तगत करण्यात आला . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही आरोपीतांना सोबत घेवून त्यांच्या घरातुन नंदुरबार येथून चोरी केलेले सोने चांदीचे दागिने हस्तगत केले आहे . ताब्यात घेण्यात आलेला शैलेंद्र विश्वकर्मा यास अधिक विश्वासात घेवून विचारपूस केली . असता त्याने नंदुरबार येथे चोरी करण्यापूर्वी संतोषसिंग सोबत संगमनेर जि . अहमदनगर , धुळे शहरात घरफोडीचा प्रयत्न केला होता , परंतु तो यशस्वी झाला नाही . तसेच यापूर्वी मध्य प्रदेश ,आंध्र प्रदेश येथे घरफोडीचे गुन्हे त्याचे भोपाळ , सिहोर मध्य प्रदेश येथील साथीदारांच्या मदतीने केले असल्याचे सांगितले . त्याबाबत रेकॉर्ड तपासले असता शैलेंद्र विश्वकर्मा विरुध्द घरफोडीचे एकुण ६३ गुन्हे दाखल त्यात त्यास अटक देखील झालेली आहे . तसेच संतोषसिंग याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात त्याने १४ वर्ष ३ महिने भोपाळ येथील मध्यवर्ती कारागृहात कारावासाची शिक्षा भोगलेली आहे . ताब्यात घेण्यात आलेला संतोष विश्वकर्मा यास विचापुरास केली असता त्याने अत्यंत धक्कादायक माहिती दिली . गुगल मॅपद्वारे शहराचा शोध घेवून त्याठिकाणी जावून नव्याने तयार झालेल्या वसाहती शोधून एकांत ठिकाणी बंद असलेले एकसोबत ४ ते ५ घराचे कुलूप तोडून चोरी करायचे व तेथून पळ काढायचा . दिवसा घरफोडीचे गुन्हे करुन धुमाकुळ घालणारी आंतर राज्यीय टोळीतील संशयित आरोपी शैलु ऊर्फ शैलेंद्र रामचरण विश्वकर्मा रा. हनुमान मंदीर जवळ चाणक्यपुरी सिहोर ता.जि. सिहोर मध्य प्रदेश, संतोषसिंग सौदागरसिंग ( मोने पंजाबी ) रा . राजीव गांधी नगर , सेक्ट- A , EWS , घर नंबर -२२४ अयोध्या रोड , पिपलाणी भोपाळ मध्य प्रदेश यांना ताब्यात घेवून नंदुरबार येथील ४ व इतर जिल्ह्यात देखील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्याच्या ताब्यातुन १० लाख १० हजार रुपये किमतीचे २१ तोळे सोन्याचे दागिने , चांदीचे दागिने , १५ हजार रुपये रोख , २ हजार रुपये किमतीचे मोबाईल व ३ लाख ५० हजार रुपये किमंतीची गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन असा एकुण १३ लाख ७७ हजार ३३५ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेले आहेत . ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडे अधिक विचारपूस करून त्यांच्याकडुनही आणखी घरफोडीचे गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे असे यावेळी पोलीस अधिक्षक पी . आर . पाटील यांनी सांगितले . पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे अभिनंदन करुन तपास पथकास विशेष रोख बक्षीस जाहीर केले आहे . तसेच नंदुरबार शहरातील नागरीकांनी देखील स्थानिक गुन्हे शाखेच्या संपूर्ण पथकाचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहे . सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , सहा . पोलीस निरीक्षक संदीप पाटील , पोलीस हवालदार दिपक गोरे , महिला पोलीस हवालदार पुष्पलता जाधव , पोलीस नाईक राकेश बसावे , पोलीस अमंलदार विजय ढिवरे , अभिमन्यु गावीत व संपूर्ण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.








