Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोपर्ली येथे महिलेला वाचविण्यासाठी गेलेला २० वर्षीय युवकाचा विद्युत शॉक लागून मृत्यू

team by team
November 24, 2021
in क्राईम
0
कोपर्ली येथे महिलेला वाचविण्यासाठी गेलेला २० वर्षीय युवकाचा विद्युत शॉक लागून मृत्यू

नंदुरबार | प्रतिनिधी-
महिलेला वाचविण्यासाठी गेलेल्या २० वर्षीय युवकाचा विद्युत शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली येथे घडली.
नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते हिरालाल विठ्ठल चौधरी यांचे चिंरजीव शुभम हिरालाल चौधरी यांचे शिक्षण नंदुरबार, शिरपूर तसेच नांदेड येथे झाले. शिक्षणासाठी ते बाहेरच असल्यामुळे त्यांच्या गावाशी जास्त संपर्क नव्हता. मात्र कोरोना काळामुळे दोन वर्षांपासून कोपर्ली येथे वास्तव्यास होते. शुभम चौधरी हा पुढील शिक्षणासाठी शिरपूर येथे बीईएमएससाठी शिरपूर येथे जाणार होते. त्यासाठी आज दि.२४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १० वाजेदरम्यान कपडे प्रेस करण्यासाठी कोपर्ली गावातील धोबीकडे गेले असता त्या घरासमोर एका घरात लोखंडी दरवाज्यात विद्युत प्रवाह उतरल्याने त्या घरात राहणार्‍या सविता योगेश पवार (गोंधळी) (वय २७) या महिलेला विद्युत प्रवाहाचा शॉक लागल्याने त्या दरवाजाला चिटकल्या हे शुभम चौधरी यांच्या लक्षात आल्याने ते सदर महिलेच्या मदतीसाठी धावले. दरम्यान यावेळी नागरीकांनी त्या दरवाज्यात विद्युत प्रवाह उतरलेला आहे असे सांगितले. मात्र शुभम चौधरी यांनी कुठल्याही गोष्टीची परवा न करता त्या महिलेला वाचविण्यासाठी तेथे धाव घेत त्या महिलेला खेचले. या दरम्यान या दरवाज्याला शुभम हिरालाल चौधरी (२७) हे चिटकले. त्यामुळे नागरीकांनी शुभम चौधरी यांना कोपर्ली गावातील आरोग्य केंद्रात नेले. मात्र त्याठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्याने शुभम याला नंदुरबार येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. शुभम चौधरी याचे शवविच्छेदन करून त्याच्या कुटूंबियांकडे मृतदेह सोपवण्यात आला. सायंकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान सविता योगेश पवार या महिलेची प्रकृती गंभीर असून तिला जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शुभम चौधरी याचा मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कोपर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र त्याठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्याने एका युवकाला आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहे. याठिकाणी कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी. अशी मागणी नागरीकांनी केली आहे.
आज दि. २४ नोव्हेंबर रोजी नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली येथे सदर घटना घडत असतांना फरीद पिंजारी यांनी याबाबतची सूचना विद्युत वितरण कंपनीला तीनदा फोन करून कळवूनही विद्युत वितरण कंपनीतर्फे वीजपुरवठा खंडीत करण्यात आला नाही. विद्युत वितरण कंपनीतर्फे वीजपुरवठा खंडीत केला गेला असता तर कदाचीत युवकाचे प्राण वाचले असते. त्यामुळे नागरीकांनी विद्युत वितरण कंपनीबद्दल रोष व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या सरचिटणीसपदी महेंद्र कलाल यांची नियुक्ती

Next Post

नंदुरबार येथे दिवसा घरफोडीच्या गुन्ह्यातील २ अट्टल गुन्हेगारांना पुणे येथून अटक, १३ लाख ७७ हजाराचा मुद्देमाल जप्त.४ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add