नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा शहरातील एका गॅरेजमधून चोरट्याने दीड लाख रुपये किंमतीचे चारचाकी वाहन लंपास केल्याची घटना घडली होती. दरम्यान तळोदा पोलिसांनी या गाडीचा शोध घेतला असून याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, तळोदा तालुक्यातील चिनोदा येथील दिलीप विठोबा शिंदे बोलेरो चारचाकी वाहन (क्र.एम.एच.३९ २५२०) तळोदा शहरातील अय्याज अन्सारी यांच्या गॅरेजमध्ये होते. सदर दीड लाख रुपये किंमतीचे चारचाकी वाहन चोरट्याने संधी साधून लंपास केले. याबाबत दिलीप शिंदे यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत तळोदा पोलीस निरीक्षक केलसींग पावरा यांनी लागलीच गुन्ह्यांचे गंभीर्य ओळखून गुन्हयांतील चोरी गेलेली महिंद्र बोलेरो गाडी शोधली तसेच याप्रकरणी संशयित आरोपी श्रीकांत दत्तात्रय पाडवी रा . राजविहीर ता . तळोदा यास याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले.सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक पी . आर . पाटील, अपर अधिक्षक विजय पवार उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक केलसिंग पावरा, पोहेकॉ सुधिर गायकवाड , पोना हर्षल साळुंखे , चालक पोना. अनिल पावरा , पोना रविंद्र पाडवी, पोका तेजला तडवी यांनी केली आहे.याप्रकरणी गुन्हयांचा पुढील तपास पोहेकॉ सुधिर गायकवाड करीत आहे .








