नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे दंगली घडवून आणल्याच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. यात जिल्हाध्यक्ष विजय चौधरी सह आमदार राजेश पाडवींना समावेश आहे.

त्रिपुराच्या पार्श्वभुमीवर राज्यात नांदेड, अमरावती आणि मालेगाव याठिकाणी झालेल्या घटनांच्या निषेधार्थ आज भाजपाने पुकारलेले आंदोलन पोलीसांनी दडपले आहे. आज या साऱ्या घटनांच्या निषेधार्थ भाजपा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार होते. मात्र सकाळी सर्व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपा कार्यालयात गोळा झाल्यानंतर ते कार्यालयाच्या बाहेर पडताच पोलीसांनी त्यांना ताब्यात घेत पोलीस गाडीतुन त्यांची रवानगी पोलीस स्टेशनकडे केली आहे. कालच भाजपा जिल्हाध्यक्षांना कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभुमीवर आंदोलन न करण्याची नोटीस देण्यात आलेली होती. मात्र तरीही पोलीस नोटीसीला न जुमानता ते आंदोलनावर ठाम राहील्याने जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थीतच्या पाश्वभुमीवर पोलीसांनी हि कारवाई केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय चौधरींसह, आमदार राजेश पाडवींना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा घेऊन जात असताना पोलिसांनी रस्त्यात अडवून शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली आहे. पोलिसांच्या दडपशाहीचा यावेळी भारतीय जनता पार्टीच्यावतीने निषेध करण्यात आला.








