शहादा l प्रतिनिधी
दि.२३ नोव्हेंबर रोजी अंगारकी चतुर्थी असून शहादा तालुक्यातील जयनगर येथील श्री. हेरंब गणेश मंदिर शासनाने मंदिरे खुले केल्यानंतर आलेल्या पहिल्या अंगारकी चतुर्थीला भाविकांना दर्शन तसेच नवस फेडता येणार आहे, त्यामुळे भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
ऑक्टोबर महिन्यात शासनाने कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने मंदिरे खुले करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या लाटेनंतर मंदिरे खुले केल्यानंतर ही दुसरी अंगारकी चतुर्थीचा योग असून जयनगर येथे भाविकांना दर्शन तसेच नवस फेडता येणार आहे. गेल्या दीड वर्षापासून कोरोना काळामुळे दोनदा शासन आदेशान्वये मंदिरे बंद करण्यात आली होती. यावर्षी दुसऱ्या लाटेत लॉकडाऊन झाल्यानंतर एक दोन चतुर्थीचा योग आला होता. मात्र मंदिर बंद असल्याने भाविकांना बाहेरूनच दर्शन घ्यावे लागले होते. तसेच मंदिरे बंद असल्याने ज्या भाविकांनी अंगारकी चतुर्थीला नवस मांडलेला होता, त्यांना नवस फेडता आलेला नव्हता. म्हणून आता भाविकांना या अंगारकीला चतुर्थीला जयनगर येथे श्री. हेरंब गणेश देवस्थानात नवस फेडता येणार आहे.शासन आदेशान्वये मंदिरे खुली झाली असली तरी कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता येथे अंगारकी चतुर्थीला भाविकांच्या दर्शनासाठी खास नियोजन करण्यात आले आहे.










