Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

असली येथे महाआरोग्य तपासणी शिबीराचा २ हजार नागरिकांनी घेतला लाभ

team by team
November 21, 2021
in आरोग्य
0
असली येथे महाआरोग्य तपासणी शिबीराचा २ हजार नागरिकांनी घेतला लाभ

धडगाव l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या सातपुड्यातील धडगाव तालुक्यातील असली येथे दऱ्याखोऱ्यात राहणार्‍या आदिवासी बांधवांसाठी आश्रय दुर्ग बहुउद्देशीय संस्था नवापूर व डॉ. आदिमा के. पाडवी, अ‌‌ॅड. गोवाल के. पाडवी यांच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात सुमारे २ हजार नागरिकांनी लाभ घेतला.


आदिवासी कुलदेवता देव मोगरा मातेचे पूजन करून डॉ. आदिमा के पाडवी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला उपस्थित सर्व मान्यवर व डॉक्टरांचा डॉ.आदिमा के. पाडवी व अ‌‌ॅड. गोवाल के. पाडवी यांच्या हस्ते स्वागत करण्यात आला. महाआरोग्य शिबिरात तालुक्‍यातील नागरिक मोठ्या प्रमाणात आले होते. सर्वप्रथम रुग्णांची नाव नोंदणी करून सर्वसाधारण तपासणीनंतर एकूण १६ विभागांमध्ये रुग्णांची वेगवेगळ्या आजारांवर तपासणी करून त्यांना औषधोपचार करण्यात आला. शिबिरात अस्थिरोग तपासणी, नाक, कान, घसा, बालरोग तपासणी, स्त्री रोग तपासणी, नेत्ररोग तपासणी, दंतरोग तपासणी, यासह नाशिक-होम मानवता हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टर द्वारे तोंडाचा कॅन्सर, गर्भ पिशवीचा कॅन्सर, स्तन कॅन्सर रोगाचे निदान शिबीरात करण्यात आले होते. विशेष म्हणजे शिबिरांमध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचे एक्स-रे मशीन द्वारे नागरिकांची तपासणी करण्याची सुविधादेखील उपलब्ध करण्यात आली होती. तज्ञ डॉक्टरांच्या तपासणीनंतर रुग्णांना तत्काळ मोफत औषधेही देण्यात आली. शिबिरात डॉ. शिरीष शिंदे – सर्जन, डॉ. भुपेंद्र पाटील – सर्जन, डॉ. अश्विन पाटील – स्त्री रोग तज्ञ, डॉ. जयसिंग वळवी – दंतरोग तज्ञ, डॉ. राजेश कोळी – कान, नाक, घसा तज्ञ, डॉ. जय देसाई – नेत्ररोग तज्ञ, नाशिक मानवता हॉस्पिटल येथील डॉ. कृष्णा तडस – तोंडाचा कॅन्सर तज्ञ, डॉ. गरीमा जैन – स्त्री रोग कॅन्सर तज्ञ, शहादा डॉ. अभय बोरा – आयुर्वेदाचार्य, डॉ. गुफरान अहेमद – यूनानी शेख आरीफ – युनानी, डॉ. सॅम्युअल मावची – कुष्ठरोग क्षयरोग टीबी, डॉ. ललित क्षिरसागर – कोवीड लसीकरण, डॉ. श्रीराम पाटील – एक्स रे- रेडियेशन. आदी तज्ञ डॉक्टरांनी आरोग्य शिबिरात रुग्णांना विविध आजारांवर तपासणी करून सेवा दिली तर या रुग्णांना शिबिरामध्ये तपासणीदरम्यान गंभीर झालेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी नंदुरबार येथे रेफर करण्यात आले असून पुढील काही दिवसात त्यांना योग्य तो उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिबिरामध्ये कोवीड लसीकरणाच्या कक्षाद्वारे 120 नागरिकांना लसीकरणचा लाभ देण्यात आला. सातपुडा दुर्गम भागातील नागरिकांना तज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरात दोन हजार पेक्षा अधिक गरजू रुग्णांनी लाभ घेतला. आश्रय दुर्ग बहुउद्देशीय संस्थेचे आरोग्य समन्वयक अभय त्रिभुवन यांच्यासह २० शिकाऊ नर्स व ब्रदर यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. सदर शिबिरातील तज्ञ डॉक्टर व नागरिकांचे डॉ. आदिमा के. पाडवी, अ‌‌ॅड. गोवाल के. पाडवी यांनी सर्वांचे आभार मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा पोलीस ठाण्यातील पो.कॉ नरेश जगदाळे सव्वा महिन्यापासून बेपत्ता

Next Post

बेडकीपाडा सीमा तपासणी नाक्यावरील चार वजन काट्यात आढळून आली तफावत, वैधमापन शास्त्र विभागाने चार काटे केले सील

Next Post
बेडकीपाडा सीमा तपासणी नाक्यावरील चार वजन काट्यात आढळून आली तफावत, वैधमापन शास्त्र विभागाने चार काटे केले सील

बेडकीपाडा सीमा तपासणी नाक्यावरील चार वजन काट्यात आढळून आली तफावत, वैधमापन शास्त्र विभागाने चार काटे केले सील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add