Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बेडकीपाडा सीमा तपासणी नाक्यावरील चार वजन काट्यात आढळून आली तफावत, वैधमापन शास्त्र विभागाने चार काटे केले सील

team by team
November 21, 2021
in क्राईम
0
बेडकीपाडा सीमा तपासणी नाक्यावरील चार वजन काट्यात आढळून आली तफावत, वैधमापन शास्त्र विभागाने चार काटे केले सील

नवापुर l प्रतिनिधी
तालुक्यातील बेडकीपाडा सीमा तपासणी नाक्यावरील सद्भाव इंटरप्राईजेस लिमिटेड कंपनीला अवजड वाहनांचे मोजमाप करण्यासाठी ठेका देण्यात आला आहे.या ठिकाणी दोन्ही बाजूस २४ वजन काटे आहेत. येथे येणाऱ्या दोन आणि जाणाऱ्या दोन असे एकूण चार वजन काट्यात तफावत आढळून आल्याने वैधमापन शास्त्र विभागाने चार काटे सील केले आहेत.
ऑल इंडिया मोटार ट्रान्संपोर्ट काँग्रेसच्या नाशिक, धुळे जिल्हा तसेच मोटर मालक कामगार वाहतूक संघटना यांच्या तक्रारीवरून वजन माप विभागाकडून तपासणी करण्यात आली. १८ नोव्हेंबर रोजी वजन माप उपनियंत्रक गिरनार  त्यांचे सहकारी टीम यांनी कारवाई केली आहे.
महाराष्ट्र गुजरात नवापूर सीमा तपासणी नाक्यावरील १७ वजन काटे तपासणी करून त्यापैकी ४ वजन काट्यामध्ये अनियमितता(दोष) आढळून आल्याने सिल करण्यात आले.व सदभाव कंपनीला नोटीस देऊन चार काटे वापर करण्यास बंदी करण्यात आली आहे.
त्यांच्या कंपनीच्या असलेल्या काट्यामध्ये फरकाचे लवकर निराकरण करण्याची तंबी देण्यात आली तसे न केल्यास कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे संकेत देण्यात आले.
ऑल इंडिया मोटार ट्रान्संपोर्ट काँग्रेसच्या नाशिक ,धुळे तसेच मोटर मालक कामगार वाहतूक संघटने च्या कार्यालयात वाहनं मालकांकडून नवापूर  सदभाव कंपनीचा वजन काट्यात फरक आहे. त्यामुळे वाहन चालकांची मोठी आर्थिक पिळवणूक होत आहे अश्या प्रकारच्या तक्रारी वाहन मालकानं कडून आल्या आहेत त्या अनुषंगाने सदभाव कंपनीचे काटे चेक करण्यात आले होते.

बातमी शेअर करा
Previous Post

असली येथे महाआरोग्य तपासणी शिबीराचा २ हजार नागरिकांनी घेतला लाभ

Next Post

तळोदा येथे आदिवासी साहित्य व संस्कृती प्रदर्शन

Next Post
तळोदा येथे आदिवासी साहित्य व संस्कृती प्रदर्शन

तळोदा येथे आदिवासी साहित्य व संस्कृती प्रदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add