नंदुरबार ! प्रतिनिधी
राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली यांच्यामार्फत अनुसूचित जातीतील चर्मकार समाजासाठी ‘सपोर्ट फॉर मार्जिनलाईज्ड इंडिव्हिज्युअल फॉर लाईव्हलीहूड ॲण्ड एन्टरप्राईज’ (स्माईल ) ही नवीन योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे.
या योजनेतंर्गत कोविड-19 मुळे ज्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती मृत्यू पावली आहे अशा कुटूंबातील प्रमुख वारसदारास एनएसएफडीसी नवी दिल्ली यांच्यामार्फत पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज व्यवसायासाठी देण्यात येणार आहे.
एनएसएफडीसी योजनेसाठी कर्जाची रक्कम 4 लाख रुपये असेल तर एक लाख रुपये भांडवली अनुदान असून कर्जासाठी व्याज दर 6 टक्के राहील. या कर्जयोजनेसाठी मृत व्यक्तींचे नाव, संपूर्ण पत्ता, आधार क्रमांक, जन्मतारीख, लिंग, जात/पोट जात, मृत्यूचा दिनांक, रेशनकार्ड, मयत झालेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, कुटुंबातील व्यक्तींची एकूण संख्या, कु्टुंबातील प्रमुख वारसदार, कुटुंबातील व्यक्तींचे वार्षिंक उत्पन्न (तीन लाख रुपयांच्या आत) आदी माहिती आवश्यक राहील.
कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील व्यक्तीने वरील माहिती महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावी अथवा महामंडळाच्या mktprod@lidcom.co.in या ईमेलवर पाठविण्यात यावी. https://forms.gle/ Q485fSUQYEuL4xUx7 या लिंकवर माहिती सादर करता येणार असून चर्मकार समाजातील कुटुंबानी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यु.जे.देवकर यांनी केले आहे.