Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा -शिरपूर व दोंडाईचा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शेतकरी संघर्ष समितीतर्फे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घातला घेराव

team by team
November 16, 2021
in Uncategorized
0
शहादा -शिरपूर व दोंडाईचा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शेतकरी संघर्ष समितीतर्फे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घातला घेराव

शहादा l प्रतिनिधी
अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या शहादा -शिरपूर व शहादा दोंडाईचा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शेतकरी संघर्ष समिती, विविध गावातील ग्रामस्थ ,सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते यांच्या तर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्याचा होणारा त्रास मांडत संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.कार्यालयात लोकसंसदही भरली. संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरच रस्ता दुरुस्तीचे लेखी आश्वासन अभिजीत पाटील यांना दिल्याने जनआंदोलन मागे घेण्यात आले.

शहादा-शिरपूर व शहादा-दोंडाईचा रस्त्याची पूर्ण वाताहत झाली आहे. रस्त्यावर गुडघ्या एवढे खड्डे झाले आहेत. संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आहे. वाहनधारक तसेच शेतकऱ्यांच्या जीवावर हा रस्ता उठला आहे. शेतकऱ्यांच्या शेतमाल पक्व झाला असून रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहतुकीसाठी वाहतूकदार धजावत नसल्याने शेतकऱ्यांचे न भरून निघणारे नुकसान होत आहे. संबंधित विभागाला जाग यावी यासाठी शेतकरी संघर्ष समिती, परिसरातील व पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने आज दि.१६ रोजी सकाळी ११ वाजता येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे अभिजित पाटील,
आर. आर. बोरसे, भगवान पाटील, कांतीलाल टाटीया, बाबा पाटील, वाहन चालक मालक संघटना, विनोद बाफना,नाना निकुंभ,यशवंत चौधरी, संतोष वाल्हे, अनिल भामरे, संजय पाटील,अनिल कुवर,तुषार गोसावी आदींसह शेतकरी बांधव विविध पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. तर प्रशासनातर्फे प्रांताधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पी. जे. वळवी, शाखा अभियंता एस.वाय पगारे, राष्ट्रीय महामार्ग धुळे विभागाचे उपकार्यकारी अभियंता भालचंद्र बोरसे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे होणारी अडचण, दैनंदिन अपघात,शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान याबाबत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले अधिकारी मात्र अनुत्तरीत झाले होते. प्रांताधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे, शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार, सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ आदींसह पोलिस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त केला होता.

शेतकरी हितासाठी रस्त्याच्या दुरावस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यालयात आंदोलन करुन लोकसंसद भरवण्यात आली.यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते,शेतकरी बांधव उपस्थित होते.यावेळी राष्ट्रीय महामार्ग धुळे विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांनी रस्ता दुरुस्ती बाबत लेखी निवेदन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
अभिजित पाटील (शेतकरी संघर्ष समिती)

बातमी शेअर करा
Previous Post

चौथ्यां खेलो इंडिया युथ गेम्स 2022 करीता जिल्हा निवड चाचणीचे आयेाजन

Next Post

राष्ट्रवादीचा तळोदा तालुका युवक अध्यक्षपदी कमलेश पाडवी तर युवक शहराध्यक्षपदी योगेश पाडवी यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add