Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चौथ्यां खेलो इंडिया युथ गेम्स 2022 करीता जिल्हा निवड चाचणीचे आयेाजन

team by team
November 16, 2021
in सामाजिक
0

नंदुरबार l प्रतिनिधी
चौथ्यां खेलो इंडिया युथ गेम्सचे आयोजन 5 ते 14 फेब्रुवारी 2022 या कालावधीत हरियाणा येथे होणार आहे. यास्पर्धेसाठी महाराष्ट्रातील खो-खो, कबड्डी व बास्केटबॉल हे खेळ पात्र ठरले असून 18 वर्ष वयोगटातील मुले व मुलीची राज्य संघ निवड करण्यासाठी जिल्हास्तरावर निवड चाचणीचे 22 नोव्हेंबर 2021 रोजी आयेाजन करण्यात आले आहे.

कबड्डी व खो-खो खेळासाठी यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे तर बास्केटबॉल खेळासाठी जी.टी.पाटील महाविद्यालय,नंदुरबार येथे सकाळी 9.30 वाजता निवड चाचणी होईल.

राज्य संघ निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी पात्रता अशी, कबड्डी खेळासाठी वजन गट मुले 70 किलो व मुलीसाठी 65 किलो असेल.खेळाडूचा जन्म हा 1 जानेवारी 2003 रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा. खेळाडूकडे आधारकार्ड, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, जन्मप्रमाणपत्र (5 वर्षांपुर्वी काढलेले ) यापैकी कोणतेही दोन कागदपत्र असणे आवश्यक असेल.या निवड चाचणीत शाळा, क्लबच्या संघांना प्रवेश देण्यात येईल. तर शाळाबाह्य तसेच संघातुन सहभागी होवू न शकणाऱ्या खेळाडूंना निवड चाचणीसाठी संधी देण्यात येईल. स्पर्धा व चाचणी त्या त्या खेळाच्या अधिकृत संघटनेच्या नियमानुसार घेण्यात येईल. निवड चाचणीचे आयोजन खेलो इंडिया युथ गेम्ससाठी राज्य संघ निवड करण्यासाठी करण्यात येत असल्यामुळे यासाठी कोणतेही प्रमाणपत्र दिले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक, जगदीश चौधरी ( 9422834187 ) यांच्याशी संपर्क साधावा. राज्य संघ निवड करण्यासाठी जिल्हा निवड चाचणीत जिल्ह्यातील शाळा,कनिष्ट महाविद्यालय, क्रीडा मंडळे यांनी जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लोकसहभागातून साजरा करावा: जिल्हाधिकारी महेश पाटील

Next Post

शहादा -शिरपूर व दोंडाईचा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शेतकरी संघर्ष समितीतर्फे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घातला घेराव

Next Post
शहादा -शिरपूर व दोंडाईचा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शेतकरी संघर्ष समितीतर्फे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घातला घेराव

शहादा -शिरपूर व दोंडाईचा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शेतकरी संघर्ष समितीतर्फे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घातला घेराव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add