नंदुरबार l प्रतिनिधी
येथील मराठा-पाटील समाज मंडळाच्या जागेवर समाजासाठी मंगलकार्यालय बांधणेकामी श्रीमती उषाबाई पाटील यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेने प्रेरित होऊन कै.शाहीर हरीभाऊ पाटील यांचे स्मरणार्थ संस्थेला २५ लाख रुपयांची देणगी देऊन समाजात नवा आदर्श घालून दिला.मंगलकार्यालयाच्या भूमीपुजन व कोनशिला अनावरण कार्यक्रम श्रीमती उषाबाई पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आला आहे.
यावेळी मराठा पाटील समाज मंडळ कार्यालयाचे उद्घाटन सेवानिवृत्त सिव्हिल सर्जन डॉ.जी.एन.मराठे यांच्या हस्ते तर वधुवर कक्षाचे उद्घाटन डॉ.दीपक अंधारे यांच्या हस्ते करण्यात आले .अध्यक्षस्थानी मराठा पाटील समाज मंडळाचे अध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य बी.एस. पाटील हे होते
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता इंजिनिअर जी.एस.जाधव, डॉ. सी.डी.महाजन, डॉ.एस.जी.मोरे, डॉ. डी.पी.पाटील, शकुंतला पाटील , सौ अंधारे, मंडळाचे सचिव यशवंत पाटील ,देवराम पाटील, विश्वास पाटील ,वकील पाटील, शालीग्राम पाटील, जी.के.पाटील, बी.ए.पाटील, एस.आर.पाटील हे होते.
यावेळी मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ सदस्यपदी डॉ. एन.डी .नांद्रे यांची निवड झाल्याबद्दल तसेच नीट परीक्षेत ७२० पैकी ६३२ गुण मिळविल्याबद्दल कुमारी सानिका शिंदे हिचा सत्कार करण्यात आला.
देणगी देणार्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणातुन बी एस पाटील यांनी देणगी देणार्या त्यांचे आभार मानले तसेच मंगल कार्यालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे सर्वांच्या वतीने आश्वासन दिले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.एन.डी.नांद्रे विलास अहिरराव, राजेंद्र बागुल ,आर.बी.पाटील यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंत पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उमेश भदाणे यांनी केले.








