Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पोलीस भरतीच्या लेखी परिक्षेसाठी अडीच हजार परिक्षार्थींची दांडी

team by team
November 14, 2021
in क्राईम
0
पोलीस भरतीच्या लेखी परिक्षेसाठी अडीच हजार परिक्षार्थींची दांडी
नंदुरबार| प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा पोलिस दलातील २०१९ सालापासून कोरोनामूळे पोलीस भरती प्रक्रिया रखडली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्हा पोलीस दलाच्यावतीने भरती प्रक्रिया २५ जागांसाठी सुरू असून आज नंदुरबार शहरातील ११ केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली. या लेखी परीक्षेसाठी ४ हजार ६५१ परिक्षार्थी होते.पैकी २ हजार १३४ उमेदवार लेखी परिक्षेकरिता हजर होते.शांततेत परिक्षा पार पडली.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील सन २०१९ मधील एकूण २५ पोलीस पदाकरीता आज रविवार रोजी नंदुरबार शहरातील ११ परिक्षा केंद्रांवर में न्यास कम्युनिकेशन , मुंबई यांच्या मार्फतीने लेखी परिक्षा आयोजित करण्यात आली होती . सदर परीक्षा अत्यंत निःपक्षपातीपणे व शांततेत पार पाडण्यात आली असून लेखी परीक्षेसाठी शिपाई रिक्त विभाग नेमण्यात आलेला होता , यासाठी १ अपर पोलीस अधीक्षक , ४ पोलीस उप अधीक्षक , १५ पोलीस निरीक्षक , ४३ सहा . पोलीस निरीक्षक / उप निरीक्षक , आणि ४२१ पोलीस अमंलदार असा एकुण ४८४ पोलीस अधिकारी व अमंलदारांचा कडेकोट चोख बंदोबस्त नेमण्यात आलेला होता . या लेखी परिक्षेकरिता एकूण ४ हजार ६५१ उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर केले होते , त्यापैकी एकूण २ हजार १३४ उमेदवार लेखी परिक्षेकरिता हजर राहिले , लेखी परीक्षेचा निकाल उत्तरतालीका( ­nswer Key ) नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत संकेतस्थळ http://www.nandurbarpolice.org यावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे . उमेवारांनी आपल्या प्रश्न पत्रिकेतील प्रश्न उत्तरांचे पर्याय याची उत्तरतालीका यामध्ये पडताळणी करावी . उमेदवारांचे काही हरकती आक्षेप असल्यास त्याबाबत लेखी निवेदन दि. १७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजे पर्यंत या कार्यालयाचे ई – मेल आय.डी.sp.nandurbarmahapolice.gov.in  किंवा हेल्पलाईन नंबर ९४०५६२६९८२ यावर संपर्क साधावा . तसेच लेखी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे शारीरिक चाचणीसाठी पात्र असलेल्या उमेवारांची १:१० प्रमाणे प्रवर्ग निहाय यादी व शारीरिक चाचणीचा दिनांक व ठिकाण लवकरच नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे संकेतस्थळ http://www.nandurbarpolice.org यावर प्रसिध्द करण्यात येईल . तसेच मे न्यास कम्युनिकेशन यांचेमार्फत उमेदवारांना एसएमएस, ई – मेलद्वारे कळविण्यात येणार आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

अशी पोस्ट फेसबुक, व्हॉटसअपवर,इंन्स्टाग्राम , व्टिटरवर प्रसारीत केल्यास गुन्हा दाखल होणार, पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांचा इशारा

Next Post

औरंगाबाद येथील विद्यार्थ्यांनी केली सातपुड्यातील कुकलट येथे जलसंधारण कामाची पहाणी

Next Post
औरंगाबाद येथील विद्यार्थ्यांनी केली सातपुड्यातील कुकलट येथे जलसंधारण कामाची पहाणी

औरंगाबाद येथील विद्यार्थ्यांनी केली सातपुड्यातील कुकलट येथे जलसंधारण कामाची पहाणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add