Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अशी पोस्ट फेसबुक, व्हॉटसअपवर,इंन्स्टाग्राम , व्टिटरवर प्रसारीत केल्यास गुन्हा दाखल होणार, पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांचा इशारा

team by team
November 14, 2021
in क्राईम
0
अशी पोस्ट फेसबुक, व्हॉटसअपवर,इंन्स्टाग्राम , व्टिटरवर प्रसारीत केल्यास गुन्हा दाखल होणार, पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांचा इशारा

नंदुरबार l प्रतिनिधी
धार्मीक भावना भडकविणारे व खोट्या बातम्या प्रसारीत करणारे व्हिडीओ किंवा पोस्ट फेसबुक , इंन्स्टाग्राम , व्टिटर , व्हॉटसअपवर प्रसारीत करु नये .असे आढळल्यास त्यावर पोलीस दलातर्फे कडक कारवाई करण्यात येईल असे आढळल्यास पोलिसांशी संपर्क करा असे आवाहन पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी केले आहे.
देशातील व महाराष्ट्रातील काही भागात अप्रिय घटनेच्या अनुषंगाने धार्मीक भावना भडकविणाऱ्या काही आक्षेपार्ह पोस्ट खोट्या बातम्या प्रसारीत करणारे ऑडीओ व्हिडीओ तसेच संदेश सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत . अशा प्रकारच्या पोस्ट, ऑडीओ, व्हिडीओ तसेच फोटो फॉरवर्ड करु नये . अशा आक्षेपार्ह पोस्ट प्राप्त झाल्यास त्या त्या समाज माध्यमांवर तात्काळ रिपोर्ट करावे . सामाजिक शांतता भंग करणारे समाजविघातक व्हिडीओ पोस्ट फोटो संदेश सोशल मिडीयावर व्हायरल करणे कायद्याने गुन्हा आहे . अशा प्रकारच्या पोस्ट, व्हिडीओ, फोटो, संदेशवर लक्ष ठेवण्याबाबत फेसबुक , इंन्स्टाग्राम , व्टिटर , व्हॉटसअप इत्यादी सर्व सार्वजनिक माध्यमांना पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात आले.त्यात म्हटले आहे की, सोशल मिडीया व इंटरनेटच्या माध्यमातुन पोस्ट करतांना सामाजिक भान ठेवत माहीती तंत्रज्ञान अधिनियम २००० ( IT ACT २००० ) मधील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे . व्हॉटसअप वापरणारे, गृपमध्ये असणारे सर्व सदस्य विशेषतः गृप ॲडमिन आपल्या गृपमध्ये अशा प्रकारच्य आक्षेपार्ह पोस्ट किंवा व्हिडीओ प्रसारीत होणार नाहीत याची विशेषतः दक्षता घ्यावी . अन्यथा तसा संदेश पाठविणाऱ्यावर संबंधीत कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल . नंदुरबार जिल्ह्यात देखील अशा आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही , तरी अशा आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत केल्यास संबंधीत ईसमावर व गृप ॲडमिनवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल . तसेच फेसबुक , इन्स्टाग्राम व्हॉटसअप व्टिटरवर अशा प्रकारच्या आक्षेपार्ह पोस्ट दिसुन आल्यास तात्काळ सायबर सेल नंदुरबार ( 02564-210111 Ext.403 ) , नियंत्रण कक्ष नंदुरबार ( 02564-210113 ) यावर किंवा आपल्या नजिकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधुन माहीती द्यावी . , नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडुन सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की , अशा प्रकारचे धार्मीक भावना भडकविणारे व खोट्या बातम्या प्रसारीत करणारे व्हिडीओ किंवा पोस्ट प्रसारीत करु नये . तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये . अशा प्रकारचे आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट करतांना कोणीही आढळुन आल्यास त्याची माहीती त्वरीत नजिकच्या पोलीस ठाण्यात देण्यात यावी .असे आवाहन पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

फुस लावून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीला परत मागणाऱ्या तिच्या कुटुंबीयांना जिवे ठार मारण्याची धमकी, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

पोलीस भरतीच्या लेखी परिक्षेसाठी अडीच हजार परिक्षार्थींची दांडी

Next Post
पोलीस भरतीच्या लेखी परिक्षेसाठी अडीच हजार परिक्षार्थींची दांडी

पोलीस भरतीच्या लेखी परिक्षेसाठी अडीच हजार परिक्षार्थींची दांडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add