नंदुरबार l प्रतिनिधि

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नंदुरबार-नवापूर विधानसभा व शहादा-तळोदा, अक्कलकुवा-अक्राणी विधानसभा क्षेत्रातील नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. तसेच लवकरच मनसेची नंदुरबार जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात येईल, असे नंदुरबार-नवापूर विधानसभा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष विजय विश्वनाथ चौधरी व शहादा-तळोदा,अक्कलकुवा-अक्राणी विधानसभा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष राजेेश्वर हिरामण सामुद्रे यांनी पत्रकातुन कळविले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये व पक्ष निरीक्षक आ.विनय भोईटे यांच्या सुचनेनुसार मनसेची नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलेली आहे. पक्ष संघटन वाढविण्यासाठी लवकरच नव्याने मनसेची नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात येईल. इच्छुकांनी मनसेच्या कार्यात सहभागी होण्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन नंदुरबार-नवापूर विधानसभा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष विजय विश्वनाथ चौधरी व शहादा-तळोदा,अक्कलकुवा-अक्राणी विधानसभा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष राजेेश्वर हिरामण सामुद्रे यांनी पत्रकातुन केले आहे.









