नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील मंगळ बाजारात भाजीपाला घेत असतांना महिलेच्या गळ्यातून सुमारे पावणेदोन लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरट्याने लंपास केले.याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, तळोदा शहरातील गडबड गल्लीतील ज्योती शरद कलाल या नंदुरबार शहरातील मंगळ बाजार परिसरातील भोई गल्लीत भाजीपाला घेण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी अज्ञाताने त्यांच्या गळ्यातील १ लाख ६५ हजार रुपये किंमतीचे साडेचार तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरुन नेले. याबाबत ज्योती कलाल यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एम.आर.पाटील करीत आहेत.








