नंदुरबार | प्रतिनिधी-
बुरहानपूर येथून सुरतकडे लग्नाचे वऱ्हाड घेऊन गुरातला परतणाऱ्या एका खाजगी बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस थेट टोलनाक्यावर घुसल्याने . भीषण अपघात झाला.यात 18 प्रवासी जखमी झाले आहेत . जखमींना उपचारासाठी सोनगढ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . या अपघाताचे भीषण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे .
याबाबत सोनगढ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार , महाराष्ट्रातील बुरहानपूर येथील मुलीचे गुजरातमधील सूरत येथील मुलाशी लग्न ठरले . लग्न महाराष्ट्रात आज मुलीच्या मांडवात पार पडले . सर्व विधी , जेवणं , पाहुणचार असे लग्नाचे , सर्व सोपस्कार आनंदाने आणि उत्साहाने पार पडले . शेवटी क्षण आला तो पाठवणीचा . माहेरुन आनंदात नवरीची पाठवणी झाली . नवरा नवरी पाठोपाठ वऱ्हाडीही बसने मागोमाग निघाले . बस गुजरातमधील तापी जिल्ह्यात सोनगढ येथील मंडल टोल नाक्यावर दि.10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पोहचली . बस भरधाव वेगात असल्याने चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला अन् भरधाव वेगातील बस टोल चेकचा ब्रेकर ओलांडून थेट केबिनमध्ये घुसली . या अपघातात बसमधील 15 प्रवाशांसह टोलनाक्यावरील 3 कर्मचारी असे एकूण 18 जण जखमी झाले .चौघांची प्रकृती चिंताजनक अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी सोनगढ येथील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे . बसचा चालक , कंडक्टर आणि ड्रायव्हर केबिनजवळ बसलेले दोघे गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे . चौघांना तापी जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले आहे . अपघात इतका भीषण होता की , केबिनमध्ये बसलेली महिला कॅशियरही जखमी झाली असून तिचा पाय फ्रॅक्चर झाला आहे . त्याचवेळी केबिनजवळ उभी असलेली एक महिला आणि एक पुरुष कर्मचारीही जखमी झाला . बसच्या धडकेने टोलनाक्याची केबिन पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून , तेथे ठेवलेल्या मशिन्सचेही नुकसान झाले आहे . याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरेही फुटले .वऱ्हाडींनी भरलेल्या बसमध्ये सुमारे 40 लोक होते .