Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारात आज शहिद किसान प्रेरणा यात्रेचे आगमन, नर्मदा बचाव आंदोलनाची माहिती

team by team
November 11, 2021
in राजकीय
0
नंदुरबारात आज शहिद किसान प्रेरणा यात्रेचे आगमन, नर्मदा बचाव आंदोलनाची माहिती

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यात उद्या दि.१२ व १३ नोव्हेंबर २०२१ रोजी शहिद किसान प्रेरणा यात्रा अस्थिकलश घेवून येणार असल्याची माहिती नर्मदा बचाव आंदोलनातर्फे देण्यात आली.
याबाबत नर्मदा बचाव आंदोलनातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पिकांना योग्य हमीभाव, अकाळी पावसाच्या नुकसानीची भरपाई, वनअधिकारावर अंमलबजावणी व शेतकरीविरोधी कायदे रद्द करावे, यासाठी दि.२६ नोव्हेंबर २०२० पासून दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी, शेतमजूर, स्त्रीपुरुष आंदोलन करत आहेत. देशभरातील शेतकर्‍यांच्या जमीनी मोठमोठ्या कंपन्यांना बळकवता येईल, कृषी उत्पन्न बाजार समित्याबंद पडून खाजगी मंड्यांमध्ये आजच्या इतकाही भाव शेतमालाला मिळणार नाही असे हे कृषिविरोधी कायदे आहेत. त्याविरुद्ध लढाई सुरू आहे. त्याचप्रमाणे देशभरातील नागरिकांचा आधार, राशन व्यवस्था, संपुष्टात आणणार्‍या, खाद्यान्नाच्या जमाखोरीची सूट भांडवलशहांना, अदानी, अंबानींना देण्याचा कायदाही मोडीत काढणारच हा संकल्प करण्यात आला आहे. प्रत्येक शेतीमालाला दूध, पहाडी धान्य व वनोपजालाही योग्य हमीभाव देण्यासाठी तसेच संपूर्ण कर्जमाफीसाठी कायदे आणण्यासाठी आंदोलन सुरूच आहे. आज पेट्रोल, डिझेलबरोबरच वीज, खत आदीचे भाव वाढवण्याला व वीजपुरवठ्यातील सबसिडी रद्द करून २०२० चे बिजली विधेयक पुढे नेण्याला विरोध आवश्यक आहे. शेतकर्‍यांच्याच काय, आज वाढत चाललेल्या शेतमजुरांच्याही आत्महत्या थांबवण्यासाठीच गेल्या वर्षभरात सुमारे ६४० शेतकरी शहीद झाले आहेत. लखिमपूर, खिरी, उत्तरप्रदेश व टिकरी सीमेवरील हत्येस केंद्र सरकार जबाबदार आहे. एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकर्‍यांना चिरडणे हे पाशवी कृत्य आहे. आशीष मिश्रा हा जेल भोगत असतानाच त्याचे पिता हे केंद्रीय गृहराज्यमंत्रीपदावर आरूढ राहणे लोकशाही विरोधाचे लक्षण आहे. शेतकर्‍यांच्या संयुक्त किसान मोर्चाने आक्रोश उठवल्यामुळेच शहीदांना भरपाई मिळाली असली तरीही हिंसेला हिंसेने उत्तर देणेसुद्धा मंजूर नाही. जबाबदारी स्वीकारून मंत्री अजय मिश्रांनी राजीनामा द्यावा व त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
टिकरी सीमेवर एकत्रित येणार्‍या हजारो शेतकरी महिलांवर झालेला ट्रकचा हल्ला हाही अपघात नव्हता. या हत्याकांडाची निष्पक्ष न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. या सार्‍या शहीदांचे स्मरण व प्रेरणा घेऊनच शहीद किसान प्रेरणा यात्रा ही अस्थिकलशही घेऊन काढण्यात आली आहे. सदर यात्रा नंदुरबार जिल्ह्यात १२ व १३ नोव्हेंबरला येणार आहे.
किसानविरोधी कायदे रद्द करण्यात यावे, वीजबिल २०२० रद्द कराचे, राशनव्यवस्था चालू ठेवून अधिक सशक्त करावी, वनअधिकार कायदा योग्यप्रकारे व संपूर्ण अंमलात आणावा, अवकाळी पावसाने झालेल्या या वर्षीच्या नुकसानीची भरपाई द्यावी, प्रत्येक पिकाला, दुधाला, वनोपज व मासळीलाही योग्य हमीभाव द्यावा, एकदा तरी संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, आदी हक्क मिळवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. सदर अस्थिकलश यात्रेदरम्यान उद्या दि.१२ नोव्हेंबर रोजी तळोदा येथे स्मारक चौकातून १०.३० वाजता मोटरसायकल रॅलीला सुरुवात करण्यात येणार आहे. नर्मदानगर व तेथे कार्यक्रम करून गावकर्‍यांची व प्रतिनिधींची बैठक होईल व तिथून मोटरसायकल रॅली रेवानगरकडे प्रयाण करणार आहे. १३ नोव्हेंबरला रेवानगरहून १० वाजता गोपाळपूर-मोड-काथरदेदिगर-वाडी पुनर्वसन येथे मुक्काम व दि.१४ नोव्हेंबर ला वाडी पुनर्वसन येथे नर्मदा जीवनशाळा जीवननगर येथे बालदिनाचा कार्यक्रम करून शहादा येथे येणा-या अस्थिकलश यात्रेचे स्वागत करून त्यात संयुक्त किसान मोर्चाच्या समन्वयाने शहादा येथील रॅलीत ही सहभागी होणार आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

न्यूमोनियामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात आजपासून ‘सांस’ अभियान

Next Post

बालाघाट येथील सचिन वसावे पाकिस्तान,आफ्रिका संघाविरूध्द खेळनार क्रीकेट सामना

Next Post
बालाघाट येथील सचिन वसावे पाकिस्तान,आफ्रिका संघाविरूध्द खेळनार क्रीकेट सामना

बालाघाट येथील सचिन वसावे पाकिस्तान,आफ्रिका संघाविरूध्द खेळनार क्रीकेट सामना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

January 31, 2026
नंदुरबार जिल्हाविकासाला हातभार लावणारे कणखर नेतृत्व हरपले : माजी खा. डॉ. हिना गावित

स्व.अजितदादा पवार यांना श्रद्धांजलीसाठी आज सर्वपक्षीय शोकसभा

January 31, 2026
सामूहिक विवाह सोहळ्यात ९ जोडप्याचा निकाहा

सामूहिक विवाह सोहळ्यात ९ जोडप्याचा निकाहा

January 31, 2026
मला मिळालेला पुरस्कार स्व.बटेसिंगदादा रघुवंशी यांना समर्पित : प्राचार्य शैलेंद्र रघुवंशी

मला मिळालेला पुरस्कार स्व.बटेसिंगदादा रघुवंशी यांना समर्पित : प्राचार्य शैलेंद्र रघुवंशी

January 30, 2026
भालेर येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

भालेर येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

January 29, 2026
भालेर ग्रामपंचायतीत सरपंच कविता पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन

भालेर ग्रामपंचायतीत सरपंच कविता पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन

January 29, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add