तळोदा | प्रतिनिधी

तळोदा सेवाभावे प्रतिष्ठानतर्फे टाकळी गावात चिमुकल्यांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी चिमुकल्यांना दिवाळीचा फराळ व मिठाई देऊन दिवाळी साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून एलआयसी अधिकारी राहुल सोनवणे हे होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तळोदा सेवाभावे प्रतिष्ठान अध्यक्ष उमेश सोनवणे हे होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवाभावे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संतोष जगत चौधरी यांनी केले.
यावेळेस सेवाभावे प्रतिष्ठानचे संचालक नकुल ठाकरे म्हणाले की, सेवाभावे प्रतिष्ठान ही आमची ग्रामीण व दुर्गम भागात सतत सेवा कार्य करत असते व त्यातील एक भाग म्हणजे आज दुर्गम भागात साजरी केलेली दिवाळी व असे कार्य सातत्याने सुरू राहतील अशी आशा व्यक्त केली.
या कार्यक्रमाला सेवाभावे प्रतिष्ठानाची ग्राम समिती टाकळी अध्यक्ष सुरपसिंग ठाकरे, उपाध्यक्ष धरमसिंग ठाकरे, सचिव चंबुलाला ठाकरे, ग्राम सदस्य गोरख ठाकरे, रोहित वसावे आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन कल्पेश सोनवणे, मयूर कलाल, सुनील मोरे यांनी केले होते.









