नवापूर l प्रतिनिधी
आमदार शिरीष कुमार नाईक यांनी भाऊबीज, दिवाळीनिमित्त नवापूर शहरातील मतदार बंधू भगिनी नागरिकांची सदिच्छा भेट घेत त्यांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच दिवाळी साजरा करताना आपल्या स्वतःची व परिवाराची काळजी घेत कोरोना नियमांचे पालन करण्यासंदर्भात देखिल आवाहन केल.
यावेळी आमदार शिरीषकुमार नाईक यांनी covid-19 च्या लसीकरणा संदर्भात जनजागृती करत नागरिकांना लसीकरण करून घेण्यास सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, तालुका अध्यक्ष जालमसिंग गावित,माजी नगराध्यक्ष दामू बि-हाडे,मानत सचिव तानाजी वळवी,नगरसेवक आयुब बलेसरीया,माजी नगरसेवक विनय गावीत,अजय पाटील,चंद्रकांत नगराळे,माजी उपनगराध्यक्ष सोहेल बलेसरीया,उमराण ग्रामविकास संस्था सचिव दिपक वसावे,सुभाष कुंभार,प्रा दिपक जयस्वाल,प्रा संजय पाडवी,मयुर सिंधी,सुधिर निकम,जगदीश पाटील,तुराब पठाण,रहेमत पठाण,योगेश मावची,धनसुख जोशी,फैजल पठाण यांच्यासह काँग्रेस पक्षाचे नवापूर तालुक्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.










