Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विशेष कोविड लसीकरण शिबीरानंतर आता जिल्ह्यात 30 नोव्हेंबर पर्यंत हर घर दस्तक अभियान

team by team
November 6, 2021
in आरोग्य
0
नागरिकांनी दीपोत्सवात मास्क वापरत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार l प्रतिनिधी
सध्या राज्यात सर्व जिल्ह्यात कोविड १९ लसीकरण बाबत विविध माध्यमातून लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे . त्यात १८ ते ४५ वयोगट ४५ वर्ष वयोगटावरील नागरिक ६० वर्षावरील नागरिक यांना तालुकास्तर , ग्रामस्तर येथे लसीकरण सत्राचे आयोजन करून कोविड १ ९ लसीकरण करत आहोत . त्याअनुषंगाने जिल्ह्यात नियमित लसीकरणाबरोबरच महाविद्यालयातील विद्यार्थ्यासाठी मिशन युवा स्वास्थ कार्यक्रम राबवण्यात आला होता . जिल्हाधिकारी नंदुरबार , मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद नंदुरबार यांचे आदेशानुसार दि.२ व ३ नोव्हेंबर या दिवशी विशेष कोविड १९ महालसीकरण सत्राचे आयोजन करून उत्कृष्ठ कार्य जिल्ह्यात सुरु आहे . दि 3 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यात हर घर दस्तक अभियान राबविले जाणार आहे.
या अभियानात प्रत्येक घरोघरी जाऊन पात्र लाभार्थीना लसीकरण करण्यात येणार आहे , आपले गटातील सर्व गाव, पाडे अंतर्गत असलेले सर्व घरातील पात्र लाभार्थीना उक्त कालावधीत लसिकृत करून सर्व कुटुंब कोविड १९ आजारापासून सुरक्षित करावयाचे आहे . तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय अभियान राबवणे बाबतचा सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्यात आला असून कार्यक्षेत्रातील सर्व गाव, पाडे निहाय नागरीकांनी घेतलेले लसीकरणाचा १ ला व २ रा डोस घेतलेले लाभार्थी यादी , १ ला डोस घेतलेले लाभार्थी यादी . २ रा डोस साठी लस घ्यावयाच्या तारखेसह पात्र लाभार्थी यादी , एकही डोस न घेतलेले लाभार्थी यादी . गुजरात अथवा इतर राज्यात कोविड लसीकरण घेतलेले लाभार्थी यादी इत्यादी याद्या प्रथम प्रा . आ . केंद्र निहाय अद्यावत करून तालुकानिहाय एकत्रित याद्या अद्यावत करण्यात येत आहेत . तालुकास्तरीय कृतीदल समिती सभेचे आयोजन करण्यात येणार असून समितीचे सर्व सदस्य याना अभियान बाबत विस्तृत माहिती देण्यात येऊन सहभाग घेण्यात येणार आहे त्याच बरोबर अभियानात जिल्ह्यातील, खासदार , आमदार , जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्व पदाधिकारी यांना अभियान बाबत माहिती देऊन अभियानात सहभागी करून घेण्यात येणार आहे . त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व शासकीय , निमशासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी ( महसूल विभाग , ग्रामपंचायत विभाग , शिक्षण विभाग , महिला व बाल कल्याण विभाग , कृषी विभाग व तालुका व ग्रामस्तरावरील इतर विभाग ) यांचा अभियानात सहभागी करून घेण्यात येणार आहे . त्याच प्रमाणे पत्रकार , सामाजिक संस्था यांचा सहभाग व सहकार्य घेण्यात येत आहे . त्याबाबत सर्व विभागांशी समन्वय साधण्यात बाबत कळवण्यात आले आहे . अभियान बाबत स्थानिक स्तरावर स्थानिक बोली भाषेत जनजागृती करण्यात येत असून दवंडी तसेच गावातील प्रतिष्ठित पदाधिकारी , नागरिक , अधिकारी , कर्मचारी , विद्यार्थी यांनी प्रचार फेरीचे आयोजन करण्यात येनार आहे , तालुकास्तरावरून अभियानाबाबत जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्यात येणार असून नागरिकांनी कोविड १ ९ लस घेण्याबाबत प्रशासनामार्फत आवाहन करण्यात येत आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे मराठी रंगभूमी दिनानिमित्त नटराज व रंगमंच पूजन

Next Post

बालकाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकासह महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू

Next Post
बालकाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकासह महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू

बालकाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकासह महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add