Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे मराठी रंगभूमी दिनानिमित्त नटराज व रंगमंच पूजन

team by team
November 6, 2021
in राज्य
0
नंदुरबार येथे मराठी रंगभूमी दिनानिमित्त नटराज व रंगमंच पूजन

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे मराठी रंगभूमी दिनानिमित्त शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात नटराज व रंगमंच पूजन करण्यात आले.
दि. 5 नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून नंदुरबार शहरातील जिभाऊ करंडक आयोजन समिती तर्फे शहरातील श्री.छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे एकत्र येऊन तेथील रंगमंच पूजन व नटराज पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नटराज पूजन दिग्दर्शक प्रमोद नाईक व अभिनेते रणजित राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले. तर रंगमंच पूजन अहिराणी साहित्यिक विजय पाटील व मराठा सेवा संघाचे हंसराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नाट्यकर्मी नागसेन पेंढारकर व तुषार ठाकरे यांनी जिभाऊ करंडक आयोजन समिती तर्फे दर महिन्याच्या पहिल्या रविवारी विविध नाट्य प्रकार सादर करण्याचा उपक्रम घेण्याचा मानस व्यक्त केला असून त्या उपक्रमासाठीचे ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येईल असे सांगितले. या प्रसंगी मराठा सेवा संघाचे राजेंद्र पाटील म्हणाले की नंदुरबार च्या नाट्यचळवळीसाठी मराठा सेवा संघातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. तसेच संतोष पाटील, दिग्दर्शक प्रमोद नाईक, अभिनेते रणजित राजपूत यांनी देखील आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. त्याचप्रमाणे, कोरोनाची पार्श्वभूमी बघता नाट्यगृह तसेच सिनेमागृह बंद होते. मात्र राज्य सरकारने नाट्यगृह व सिनेमागृह पूर्णपणे उघडण्याचा व विविध व्यावसायिक नाटक, एकांकिका स्पर्धा यांना परवानगी देण्याचा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे असे प्रतिपादन यावेळी जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजक तथा नाट्यकर्मी नागसेन पेंढारकर यांनी केले. सदर कार्यक्रमात नाट्यकर्मी मनोज सोनार, तुषार ठाकरे, मराठा सेवा संघाचे जिल्ह्याध्यक्ष रमेश पाटील, नाट्यकर्मी राजेश जाधव, आशिष खैरनार, किरण दाभाडे, एन.टी.पाटील, सागर कदम, मराठा सेवा संघाचे जिल्हासरचिटणीस सतीश पाटील, मधुकर पाटील, मनोज पवार, आनंदराव करनकाळ, नितीन पाटील, रविशंकर सामुद्रे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

केवडीपाडा येथे दिवाळीच्या दिवशी लहान भावाने केला मोठया भावाचा खून,एकास अटक

Next Post

विशेष कोविड लसीकरण शिबीरानंतर आता जिल्ह्यात 30 नोव्हेंबर पर्यंत हर घर दस्तक अभियान

Next Post
नागरिकांनी दीपोत्सवात मास्क वापरत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

विशेष कोविड लसीकरण शिबीरानंतर आता जिल्ह्यात 30 नोव्हेंबर पर्यंत हर घर दस्तक अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add