नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनीत आरडाओरड करीत तलवार फिरवून दहशत माजवून एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नुकसान करून दहशत पसरवण्याऱ्या युवकाला उपनगर पोलिसांनी अटक केली आहे .
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल रविंद्र मराठे रा. गिरीविहार गेट भिलाटी, नंदुरबार याने सिंधी कॉलनीत किंग्स मेन्स वेअर रेडीमेड कपड्याच्या दुकानाच्या शटरवर तलवारीने मारले . व त्याच तलवारीने दुकानासमोरील सी. सी. टी.व्ही कॅमेरा फोडून नुकसान केले .याप्रकरणी जितेंद्र गुरुमूखदास किंगर यांच्या फिर्यादीवरून
उपनगर पोलीस ठाण्यात विशाल रविंद्र मराठे यांच्या विरुद्ध भारतीय कायदा कलम भादंवि ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास हवलदार राजेंद्र दाभाडे करीत आहेत.










