Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिवशरणार्थ संबोधून गवळी समाजाच्या सगर उत्सवाची सांगता

team by team
November 6, 2021
in सामाजिक
0
शिवशरणार्थ संबोधून गवळी समाजाच्या सगर उत्सवाची सांगता

शेकडो वर्षापासून सुरू असलेली सगर उत्सवाची परंपरा वीरशैव लिंगायत गवळी समाजाने यंदाही कायम राखली आहे. मुक्या प्राण्यांप्रति स्नेहभाव जपण्यात आला. शिवशरणार्थ संबोधून शुक्रवारी दुपारी गवळी समाजाचेतर्फे नंदनगरीत सगर उत्सवाची सांगता झाली.
श्रीकृष्णाचे वंशज असलेल्या गवळी समाजात प्रतीवर्षी बलिप्रतिपदा पाडव्याच्या दिवशी गोवर्धन पूजनाचे महत्त्व आहे. याच परंपरेला सगर उत्सव म्हटले जाते. म्हशी आणि रेडे यांना पारंपरिक पद्धतीने सजवून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. बालवीर चौक, गवळीवाडा, देसाईपुरा परिसरातून रेड्यांची मिरवणूक काढण्यात आली. ऐतिहासिक सोनी विहिर येथे गवळी समाजाच्यावतीने मानकरी यांच्या उपस्थित शिवशरणार्थ संबोधून पूजन करण्यात आले. यावेळी रेडयांनी सलामी दिली तर म्हशी देखील नतमस्तक झाल्या. कोरोना पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने सगर उत्सव साजरा करण्यात आला. सलग दुसऱ्या वर्षीही रेड्यांची झुंज रद्द करण्यात आली होती. इंटरनेट आणि धावपळीच्या युगात देखील गवळी समाजातर्फे ऐतिहासिक नंद गवळी राजाच्या नंदनगरीत दिवाळीनिमित्त शिवशरणार्थ संबोधून आजची युवा पिढी देखील सगर उत्सवाची परंपरा भविष्यात कायम राहील असा विश्वास वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे तलवार फिरवून दहशत निर्माण करणाऱ्या एकाला अटक

Next Post

विसरवाडी सरपंच बकाराम गावित यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा 7 नोव्हेंबरला शिवसेनेत प्रवेश

Next Post
विसरवाडी सरपंच बकाराम  गावित यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा 7 नोव्हेंबरला शिवसेनेत प्रवेश

विसरवाडी सरपंच बकाराम गावित यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा 7 नोव्हेंबरला शिवसेनेत प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add