नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटी अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात कॉंग्रेस सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात.महाराष्ट्राच्या प्रथम क्रमांकाच्या विधानसभा, नंदुरबार लोकसभा मतदारसंघ या प्रथम क्रमांकाच्या धडगाव, अक्कलकुवा मतदार संघातील अक्कलकुवा येथे कॉंग्रेसच्या सदस्य अभियानाची सुरुवात नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकासमंत्री ना.ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सभासद नोंदणी मोहीमेला अक्कलकुवा येथुन प्रारंभ झाला . यावेळी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात पालकमंत्री ॲड . के . सी . पाडवी, काँग्रेसचे महाराष्ट्र उपाध्यक्ष माजी मंत्री ॲड . पद्माकर वळवी , आ . शिरीष नाईक , जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड.सीमा वळवी , जि . प . समाज कल्याण सभापती रतन पाडवी , महिला बालकल्याण सभापती निर्मला राऊत , सभापती अजित नाईक , जिल्हा परिषद सदस्य सी . के . पाडवी , प्रताप वसावे , सुरैय्याबी मक्राणी , हेमलता शितोळे , अक्कलकुवा पंचायत समितीच्या सभापती मनीषा वसावे , उपसभापती विजय पाडवी , जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक , सुभाष जि . प . माजी उपाध्यक्ष सुहास नाईक , आरिफ मक्राणी , जुबेर मक्राणी , अमृत चौधरी , हनिफ पाटील ,बलोच , हाफिज मक्राणी , दिलीप पाडवी , माजी जि . प . सदस्य लतीफ अन्सारी , मन्सूर मेमन , शांतीलाल जैन , डी . आय . मक्राणी , देवचंद अहिरे , आर . सी . गावित आदी उपस्थित होते .
यावेळी सदर कार्यक्रमावेळी नुकत्याच झालेल्या जि.प.निवडणूकीत विजयी झालेले सदस्य सौ.हेमलता शितोळे,कु.गिताताई पाडवी व सुरैय्याबी मकराणी यांच्या सह जि.पचे सभापती रतन पाडवी,श्री.नाईक व सौ.निर्मला राऊत यांच्यासह जि.प.अध्यक्ष ॲड. सीमा पद्माकर वळवी यांचाही सत्कार करण्यात आलेत.
कार्यक्रमाचे उद्घाटक ना.ॲड.के.सी.पाडवी याप्रसंगी म्हणाले , गावाच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वांचे पाठबळ आणि सहकार्याची गरज असते .अक्कलकुवा नगरपंचायत करण्याचे व अक्कलकुव्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे जनतेला आश्वासन दिले.
माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी अक्कलकुवा आपला जुना मतदार संघ असल्याने आपण अक्कलकुवाच्या विकासासाठी व जि.प.अध्यक्ष ॲड.सीमा वळवी,जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ना.पाडवी सोबत सदैव राहू असे आश्वासन ही दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार शिरीष नाईकांनी सध्याच्या राज्याच्या राजकिय वातावरणावर भाष्य करत भाजपाला धारेवर धरत राज्यात इडी,एनसीबी,इन्कमटॅक्सच्या अती गैरवापराबद्दल चिंता व्यक्त करत नेत्यांना,अभिनेत्यांना फसवण्याचे काम केंद्राकडून चालवले जात असल्याने चांगला समाचार घेतला.यावेळी नवापूर , अक्कलकुवा येथील कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला .