येथील रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे नेहमी समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून गोरगरीब व गरजूंसोबत दिवाळीसारखा महत्वपूर्ण सण मानवतेची दिवाळी म्हणून साजरा करण्यात आली. नवापूर चौफुलीवरील गोसावी नगर येथे मानवतेची दिवाळी साजरा करण्यात आली. येथील गरजूंना दिवाळीचा फराळ, मिठाई, पणती वाती, रांगोळी, फटाके, कपडे व भांडी आदी साहित्याची किट बनवून सुमारे शंभर कुटुंबांना त्या अशा किट वाटप करण्यात आल्या. यावेळी गरजूंच्या चेहर्यावर समाधान दिसून आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भावासर, शिक्षणाधिकारी राहुल चौधरी, पोलीस उपनिरीक्षक दिलीप गांगुर्डे, रोटरी नंदनगरीचे मार्गदर्शक विशाल चौधरी रोटरी, लायनेसच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रात सेवा देत असलेल्या डॉ.तेजल चौधरी ह्या उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी फकरोद्दीन जलगोनवाला, दिनेश साळुंखे, सुशील गवळी, विकास तोष्णीवाल, राहुल पाटील, गोसावी समाजाचे जेष्ठ नागरिक धरमासिंग गोसावी, रोहिदास गोसावी, शेखर बंडू गोसावी उपस्थित होते. रोटरी क्लब नंदनगरीचे अध्यक्ष मनोज गायकवाड यांनी आपल्या प्रास्ताविकातून रोटरी मानवतेची दिवाळी गरीबांमध्ये जाऊन कशी साजरी करतात, याची माहिती दिली. सूत्रसंचलन किरण दाभाडे यांनी केले. तर आभार क्ल्बचे सचिव अनिल शर्मा यांनी मानले.