नवापूर l प्रतिनिधी
कोरोना या महामारीत संपुर्ण जग संकटात असतांना आपल्या जीवाची पर्वा न करता निस्वार्थ सेवा देणाऱ्या कोरोना योध्दांचा युवा नेते धनंजय भरत गावीत यांनी सत्कार व सन्मान करून त्यांचे अभिनंदन केले.
कोरोना महामारी मध्ये चांगली सेवा देणारे कोरोना योध्दा १०८ रुग्णवाहीकेचे चालक लाजरस गावीत,नाजिम मनियार, अमरधाम येथे कार्यरत असलेले हिरामन पाचुरने यांचा सन्मान देवमोगरा गॅस एजन्सीचे मालक धनंजय गावीत यांनी केला यावेळी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेंद्र दुसाने,मयुर पाटील आदी उपस्थित होते.कोरोना महामारीत या लोकांनी आपली जिवाची पर्वा न करता रुग्णाची सेवा केली. अशाचा सन्मान दिवाळीत करुन त्यांचा सन्मान करण्यात आल्याने त्यांच्या चेहर्यावर आनंद व समाधान दिसून येत होते. धनंजय गावित यांनी कोरोना योध्दांचा दिवाळीत केलेला सन्मान व सत्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.








